• Sat. Sep 21st, 2024

किराणा सामान उधार दिले नाही म्हणून दिला मानसिक त्रास, वैतागलेल्या मालकाने उचलले टोकाचे पाऊल

किराणा सामान उधार दिले नाही म्हणून दिला मानसिक त्रास, वैतागलेल्या मालकाने उचलले टोकाचे पाऊल

बीड: किराणा सामान उधार दिले नाही म्हणून सतत मानसिक त्रास दिल्याने एका किराणा दुकान चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारूर तालुक्यातील कान्नापूर मोहा येथे घडली आहे. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. गावातील किराणा दुकानदार अविनाश अशोक देशमुख वय वर्ष ३२ राहणार कानपूर तालुका धारूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अविनाश देशमुख यांचे कानापूर येथे किराणा दुकान आहे. गावातील स्वप्निल रामकिसन देशमुख, सुरज रामकिसन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांना अविनाशने किराणा सामान उधार दिले नाही‌. याचा राग मनात धरून यातील आरोपी किराणा चालक अविनाश देशमुख यास सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून मानसिक त्रास देत असत. या मानसिक त्रासाने अविनाश नेहमीच त्रस्त असायचे कोणत्या न कोणत्या कारणावरून भांडणंही हे तिघेजण काढत होते.

सततच्या या भांडणाला आणि मानसिक त्रासाला अविनाश कंटाळले होते. घरच्यांशी बोलतानादेखील त्यांनी हे तिघे मानसिक त्रास देत आहेत, असा उल्लेख केला होता. या सगळ्यागोष्टीचा त्रास अविनाश यांना होत होता. तसंच, सतत हालअपेष्टा आणि अपमान सहन होत नसल्याने अविनाशने स्वतःच्या शेतात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन रात्री आठच्या सुमारास आत्महत्या केली. मात्र अविनाशने ही आत्महत्या मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तींमुळे केली आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आरोपी स्वप्निल रामकिसन देशमुख, सुरज रामकिसन देशमुख ,सुमित्रा रामकिशन देशमुख, यांच्यावर शिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये मयताचे भाऊ संतोष देशमुख यांच्या फिर्यादीवरून कलम ३०६,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात पुढील काही दिवस कशी असणार पावसाची स्थिती? जाणून घ्या हवामान अंदाज
जवळच्या लोकांनी इतक्या खालच्या थरापर्यंत जाऊन मानसिक त्रास दिल्याने ही आत्महत्या घडली असल्याचे गावकरी देखील स्पष्टपणे आणि उघड बोलत आहेत. अविवाश देशमुख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. या घटनेनंतर सर्वत्र गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed