• Mon. Nov 25th, 2024
    विचित्र अपघात; चालत्या रिक्षावर इमारतीवरुन लोखंडी रॉड कोसळला, आईचा मृत्यू, लेक गंभीर जखमी

    मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडे एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडून रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर कोसळला. या रिक्षात प्रवास करणाऱ्या माय लेकीचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात आईचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गलगत असलेल्या सोनार चाळ परिसरात मलकानी डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जोगेश्वरी पोलीस दाखल झाले. त्यांनी या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिला आणि लेकीला जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयामध्ये दाखल केले.

    कोहलीने अर्धशतक झळकावले आणि पंचांनी सामना थांबवला, पाहा मैदानात असं घडलं तरी काय…
    मात्र, या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मुलगी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु केला आहे.

    Video: संकटकाळी केलेल्या मदतीची जाण ठेवली, आजिजभाईंच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजेंचा खांदा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed