• Mon. Nov 25th, 2024
    एवढंच जर जनतेचं प्रेम होतं तर लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंनी डिवचलं

    सातारा : त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचं आणि लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा, असलं वागणं काही खरं नाही. एवढंच जर जनतेचं प्रेम होतं तर लोकसभेला पडला कसे? असा सवाल विचारत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना डिवचलं.

    साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेल्या वादावर शिवेंद्रराजे यांनी सडकून टीका केली. हा वाद म्हणजे बालिशपणाचे लक्षण आहे. पेंटिंग काढण्यापेक्षा कामाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. पेंटिंग त्रयस्त लोकांनी काढलं असतं, तर ठीक होतं. पण माझ्याच गाडीत बसणाऱ्यांनी माझंच पेंटिंग काढणं, याला काय अर्थ? माझ्याच गाडीत मागे बसणाऱ्यांनी कुठेतरी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चार पेंटिंग काढली, की मलाच उमेदवारी मिळेल! असल्या गोष्टीतून हा पेंटिंग विषय झाला आहे, त्यापेक्षा ते नसलेले बरे… अशी टोलेबाजी शिवेंद्रराजे यांनी केली.

    बिल्डिंग उदयनराजेंची पण त्यांचंच चित्र काढायला पोलिसांचा विरोध, कोणत्या अदृश्य शक्तीचा दबाव?
    पेंटिंगवरून रंगलेला वाद हा बालिशपणाचे लक्षण आहे. आपल्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचं आणि माझ्यावर जनतेचं किती प्रेम आहे, हे पुन्हा त्यांनाच सांगायचं. मग जनतेचं एवढंच प्रेम होतं तर लोकसभेला पराभूत का झालात, असा सवाल करतानाच पराभवाचं कधीतरी आत्मचिंतन करा, असा सल्लाही शिवेंद्रराजेंनी दिला.

    मतं फोडली, अध्यक्षपद खेचून आणलं, ‘किंगमेकर’ कर्डिलेंना फडणवीसांकडून शाबासकीची थाप
    कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम हे त्या-त्या नेत्यांनी करायचे असते. पेंटिंगबाबत शहरातील चर्चा, प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातम्या या सर्व खोट्या! आणि असे काही घडलेच नाही, असे काही झालेच नाही,असे सांगणे म्हणजे सगळ्या घडामोडींवर पांघरून घालण्याचे लक्षण आहे. म्हणजे आपण कोणाला वेड्यात काढतोय हे त्यांना समजणे गरजेचे आहे. हे सर्व सामान्य जनतेला कळत असतं, हेही नेत्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे, असाही त्यांनी सल्ला दिला.

    आईचं निधन, पोरांचा धार्मिक विधीला नकार, वृक्षारोपण करुन राख शेतात टाकली, गावातल्या मुलींच्या नावे फिक्स डिपॉझिट
    मला काही माझं पेंटिंग काढून घ्यायची हौस नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारसंघातील लोकांची काम केली, म्हणूनच मी विधानसभेला निवडून आलो. काहींना पराभव पत्करावा लागला. काहींच्यावर तर एवढं प्रेम असूनही लोकसभा निवडणुकीत पडले हा आत्मचिंतनाचा भाग असून त्यांनी ते करावे, असं शिवेंद्रराजे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed