लखनऊच्या एसआर ग्लोबलमध्ये शिकणाऱ्या तरुणीचं हे आत्महत्या प्रकरण वाचून तुम्हाला धक्का बसेल. प्रिया इयत्ता ८वी मध्ये शिकत होती. दिसायला देखणी होती. मात्र, रागीट ती खूप होती. तिला स्वतःलाही तिच्या रागाचा कंटाळा आला होता. पण तो कसा नियंत्रणात आणायचा हे तिच्या लक्षातच आलं नाही आणि यातून तिने आत्महत्या करण्याचं भयंकर पाऊल उचललं. यावेळी तिने सुसाईड लिहिली ती वाचून पोलिसांनाही धक्का बसला. कारण, ही सुसाईड नोटही तिने रागाच्या भरात गेली होती.
तिने लिहिलं की, ‘माझ्या रागासमोर या जगाचं काहीही चालणार नाही. मी अनेक वेळा माझ्या रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. पण मला ते जमलं नाही. माझा राग आणि माझा हट्टीपणा इतका वाढला होता की तो मी कोणालाही सांगू शकत नाही आणि त्याबद्दल कोणाला कळणारही नाही’
मी इतकंच नाहीतर प्रिया हीने तिच्या अनेक किस्स्यांमधूनही तिला राग किती अनावर झाला होता. हे सांगण्याचा प्रयत्न केला. तिने पुढे लिहिलं की, ‘रागाच्या भरात हॉस्टेलमध्येही मग फोडला होता. त्यानंतर तिने आईशी भांडण केली. तिने तिच्या मावशीसोबत रागाच्या भरात खूप भांडणं केली.’ तिने एका गौरी नावाच्या मुलीचं डोकं फोडलं होतं.’ वर्गातल्या एका मुलीला तिने मारहाण केल्याचंही तिने या पत्रात लिहिले इतकंच नाहीतर तिने गणवेशही फेकून दिला, असं लिहीत ‘मी आजही रागात होते. काहीही सुचत नव्हतं. मी माझा राग नियंत्रणात आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण आता नाही. आता ते शक्य नाही’ असे लिहून अखेर तिने Thank You असं लिहत आपल्या पेनाची निब तोडली आणि या पत्राचा अखेर करत आयुष्याचाही अखेर तिने लिहिला.
पोलिसांच्या हाती लागलं आणखी एक लेटर…
याआधी ८ फेब्रुवारीला पोलिसांच्या हाती प्रियाने लिहिलेलं आणखी एक पत्र मिळालं. तिने हे पत्र ५ डिसेंबरला लिहिलं होतं. या पत्रात तिने लिहिलं होतं की, ‘तुमची कॉपी माझ्याकडे आहे. ती मी दिव्यांशीच्या हातून तुम्हाला पाठवेल. काश्मीरहून माझ्यासाठी नक्की काहीतरी घेऊन या. घरी पोहोचताच snapchat वर रिक्वेस्ट पाठवेण. रिप्लाय नक्की करा. रिप्लाय नाही केला तर खूप मारेल. आपकी लंगोटी यार. जिगरी दोस्त, पुरानी दुश्मन प्रिया राठोड’ असं तिने या पत्रात लिहिलं होतं.
कॉलेज काहीतरी लपवत असल्याचा प्रियाच्या आईचा आरोप…
ही घटना घडल्यानंतर प्रियाच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. प्रियाने नेमकं असं पाऊल का उचललं? तिने हे पत्र कोणासाठी लिहिलं होतं? हा प्रश्न त्यांच्या समोरही होता. त्यामुळे त्या म्हणाल्या की, ‘प्रियाला जर सुसाईड करायचं असतं तर त्याआधी १० मिनिटं ती फोनवर आरामात बोलत बसली नसती’ तर पुढे म्हणाल्या की, ‘माझ्या मुलीने सांगितलं होतं सगळं काही ठीक आहे. त्याच्या ५ मिनिटानंतरच ती सुसाईड करू शकते तर याचा नक्की अर्थ आहे की कॉलेज काहीतरी लपवत असेल.’
जानेवारी २० ला प्रियाचा मृत्यू जानेवारीच्या रात्रीमध्ये आत्महत्या केली. याच्या कुटुंबीयांनी तिच्या आत्महत्यावर शंका उपस्थित करत या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अजूनही तपास करत आहेत.