• Sun. Sep 22nd, 2024

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे उद्या व्याख्यान

ByMH LIVE NEWS

Mar 10, 2023
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे उद्या व्याख्यान

मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘महाराज सयाजीराव गायकवाड यांचे कार्य’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान शनिवार, दि. 11 मार्च 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक-  https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

11 मार्च हा दिवस महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिन. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्य कारभारात लागू करून राज्य यंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या, ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले, तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले. महाराजांच्या या अभूतपूर्व कार्याबद्दल त्याच्या जयंती दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या व्याख्यांनातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

0000

जयश्री कोल्हे/ससं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed