• Sun. Sep 22nd, 2024

विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रीशक्तीचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान -महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

ByMH LIVE NEWS

Mar 7, 2023
विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रीशक्तीचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान -महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

मुंबई, दि. ७ :आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समस्त स्त्रीशक्तीला महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी विविध क्षेत्रांसह समाजकारण आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रीशक्तीचा अवघ्या महाराष्ट्र भूमीला सार्थ अभिमान असल्याचे आपल्या संदेशात म्हटले आहे.

मंत्री श्री. विखे -पाटील म्हणतात की, आपल्या महाराष्ट्रभूमीला स्त्रीशक्तीचा अलौकिक वारसा लाभला असून समस्त महिला वर्गाने आजपर्यत यामाध्यमातून अनेक स्तरावर नेहमीच एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्र भूमीला राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वैचारिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्र भूमीने महिला वर्गाचा आदर आणि मान राखतानाच कर्तृत्व गाजविणाऱ्या महीलांना संधी निर्माण करून देत त्यांच्यामधील कौशल्य आणि कलागुणांना बचत गटाच्या चळवळीतून एक मंच देण्याचे काम केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशभरातील विविध क्षेत्रात, योजनात आणि कार्यक्रमात स्त्रीशक्तीचा सहभाग वाढविला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये मुलींना प्रवेश देण्यापासून ते संरक्षण दलात महिलांना दिलेली संधी देशातील महिला सन्मानाचे द्योतक मानले पाहीजे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषी आणि दुग्ध व्यवसायातून बळकट करण्यात महिलावर्गाचे योगदान लक्षणीय असून, त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे अधिकाधिक लाभ मिळू लागल्याने संधी उपलब्ध होत आहेत. निर्णय प्रक्रीयेत महिलांचा सहभाग वाढविण्यासोबतच अधिकाधिक संधी, आणि सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच स्त्रीशक्तीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed