• Sun. Sep 22nd, 2024

रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ByMH LIVE NEWS

Mar 5, 2023
रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती दि. 5 :  रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

बडनेरा येथील मैदानावर आयोजित माँ कनकेश्वरी देवी जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित रामचरित मानस कथागंगा संमेलनाला श्री. फडणवीस यांनी भेट देऊन रामायण ग्रंथ व माताजींचे दर्शन घेतले. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माँ कनकेश्वरी व रामायणाचे दर्शन घेण्याचे भाग्य आज लाभले, अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.  उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काही वेळ कार्यक्रमस्थळी थांबून रामकथेचे श्रवण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed