• Fri. Sep 18th, 2026

माजी सदस्य दिवाकर पांडे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

ByMH LIVE NEWS

Mar 3, 2023
माजी सदस्य दिवाकर पांडे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

मुंबई दि. ३ – विधान परिषदेचे माजी सदस्य दिवाकर बळवंत पांडे यांच्या निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते”, अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत सदस्य दिवाकर पांडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

दिवंगत सदस्य पांडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन डॉ. गोऱ्हे यांनी विधान परिषद सभागृहाच्या वतीने शोक प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. यावेळी सभागृहात दिवंगत पांडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या शोकप्रस्तावाची प्रत पांडे यांच्या कुटुंबियांना पाठविण्यात येणार आहे.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed