• Sat. Sep 21st, 2024

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे उद्या व्याख्यान

ByMH LIVE NEWS

Feb 28, 2023
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे उद्या व्याख्यान

मुंबई, दि.२८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मराठी भाषा आणि मराठीच्या बोली’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान बुधवार, दि. १ मार्च २०२३ रोजी सायं ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक-  https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.  यानिमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाचा भाग म्हणून ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. कार्व्हालो यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed