• Mon. Nov 25th, 2024

    जिल्ह्यात कामगारांची नोंदणी करणार; विविध योजनांच्या लाभ देण्यासाठी मेळावे घेणार – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

    ByMH LIVE NEWS

    Feb 26, 2023
    जिल्ह्यात कामगारांची नोंदणी करणार; विविध योजनांच्या लाभ देण्यासाठी मेळावे घेणार – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

    नंदुरबार,दि.26 फेब्रुवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा) : कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी  त्यांची नोदंणी करून मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

    महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे जिल्ह्यातील बांधकाम कामगांरासाठी अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटपांचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, सरकारी कामगार अधिकारी अ.ज.रुईकर, निरीक्षे वि.प्र.जोगी, वि.रा.झांबरे, ल.प्र.दाभाडे, बा.स.डुकळे यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, राज्यातील बांधकाम कामागारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या अत्यंत कमी असून बांधकाम कामगारांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहेत. अशा नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी येत्या काळात कामगार अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन जिल्ह्यात कामगारांच्या नोंदणीसाठी मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी आता बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना सुरु केली असून या योजनेमार्फत ज्या ठिकाणी कामगार काम करीत असेल अशा ठिकाणी मोफत जेवणांची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून  जिल्ह्यातील कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. अंत्योदय  अन्न योजना, प्राधान्य कुटूंबातील शिधापत्रिका धारकांना येणाऱ्या गुढीपाढवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे यात 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी आंनदाचा शिधा देण्यात येणार आहे. तसेच ज्या लोकांना घर नाही अशा व्यक्तिंना विविध योजनेच्या माध्यमातून  घरकुल देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी  मान्यवरांच्या हस्तें नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना अत्यावश्यक सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले.

    यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सु्प्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.

    राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्याच्या धनादेशांचे वितरण

    राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते तहसिलद कार्यालय, नंदुरबार येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत 28 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य, 10 लाभार्थ्यांना नविन शिधापत्रिका, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या  लाभार्थी तसेच शेतकरी आत्महत्या अर्थसहाय्य योजनेतंर्गत लाभार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित,तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार रिनेश गावित, राजेश अमृतकर,भीमराव बोरसे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed