• Fri. Mar 13th, 2026

    शासकीय अधिकाऱ्यांसाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापन’वर श्री श्री रविशंकर यांचे उद्या व्याख्यान

    ByMH LIVE NEWS

    Feb 23, 2023
    शासकीय अधिकाऱ्यांसाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापन’वर श्री श्री रविशंकर यांचे उद्या व्याख्यान

    मुंबई दि. २३ : प्रशासनात काम करत असताना शासकीय कायद्यांची अंमलबजावणीउद्देश साध्य करणेशासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम शासकीय अधिकारी आणि कर्मचारी करत असतात. शासकीय कामाचा व्याप असल्याने अधिकाऱ्यांना काहीवेळेस ताण-तणावाला सामोरे जावे लागते. मानसिक तणावाबरोबर शारीरिक तणाव विरहित काम करण्यासाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ या विषयावर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 ते 7.00 या कालावधीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे  करण्यात आले आहे.

    राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत द आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचा ताण- तणाव व्यवस्थापन’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरनरिमन पॉईंटयेथे अधिकाधिक अधिकारी यांनी शासकीय ओळखपत्रासह उपस्थित राहावे. तसेच सर्वांना या कार्यक्रमाचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटरफेसबुक आणि यु ट्यूब या समाजमाध्यमांवरून पाहता येईल.

    ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

    फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

    यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

    या लिंकच्या माध्यमातून समाजमाध्यमाद्वारे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी केले आहे.

    000

    राजू धोत्रे/विसंअ/

    धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड ; मोठा साठा जप्त – महासंवाद
    मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed