• Sat. Sep 19th, 2026

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रिया खान यांची उद्या २४ फेब्रुवारीला मुलाखत

ByMH LIVE NEWS

Feb 23, 2023
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रिया खान यांची उद्या २४ फेब्रुवारीला मुलाखत

मुंबईदि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवारदि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक-  https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

राज्यातील विकास प्रक्रिया समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज आणि निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावातसेच समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिकध्येयवादीसुजाण नागरिक तयार व्हावेत या उद्देशाने शासन स्तरावर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना शासकीय प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. त्यांच्या नव कल्पनांचा अंगीकार राज्याच्या विकासासाठी करता यावायासाठी आवश्यक पात्रतेनुसार उमेदवारांची चाचणी परीक्षेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या उपक्रमांबाबतची सविस्तर माहिती श्रीमती प्रिया खान यांनी जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed