• Sat. Sep 5th, 2026

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १८ जानेवारीला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवी, लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण

ByMH LIVE NEWS

Jan 17, 2023
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १८ जानेवारीला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवी, लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण

मुंबईदि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात कवी व लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण प्रसारित होणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कवी व लेखक प्रशांत डिंगणकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून कवितांचे सादरीकरण केले आहे. यावेळी सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी श्री. डिंगणकर यांचा परिचय करुन दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed