• Sun. Nov 24th, 2024

    अपघातापासून सुरक्षिततेसाठी “उजवीकडून चाला” अभियानाचा आज 6 जानेवारीला शुभारंभ

    ByMH LIVE NEWS

    Jan 6, 2023
    अपघातापासून सुरक्षिततेसाठी “उजवीकडून चाला” अभियानाचा आज 6 जानेवारीला शुभारंभ

    नांदेड, (जिमाका) ता. 5 :- रस्त्यावरील अपघातात पादचाऱ्यांचेवाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन यावर उपाययोजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले. पूर्वीच्या प्रघातानुसार आपण डाव्या बाजुनेच रस्त्यावर चालल्यामुळे पाठीमागुन येणाऱ्या वाहनांची कल्पना न आल्याने गेलेले बळी अधिक आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावर चालतांना समोरून येणारी वाहने आपल्याला दिसावीत व त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यादृष्टीने नांदेड जिल्ह्यात “उजव्या बाजुने चाला” ही अभिनव मोहिम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे.

    https://www.blogger.com/video.g?token=AD6v5dwlWYSkYxNeF1OadFzMAYssFea4JAiFdiH5YJ5MZImg4-xF_4_xIcYcek1OQJeHS0zBc5Ja_LuiDdH2rYaIjTGthX-FiFsxkEvFVsuDpiCpMU-Z8sjQQLsY7CZ9X3DcAKkzYEm0

    या अभिनव मोहिमेचा शुभारंभ 6 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदीर, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवर उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात करतील. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय ते वजिराबाद पोलीस स्टेशन, महावीर चौक, वजिराबाद रोड, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरही विद्यार्थ्यांचा दुसरा गट उजव्या बाजुने चालून लोकांपर्यंत हा संदेश पोहचवतील. या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed