• Mon. Sep 14th, 2026

उद्यापासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन

ByMH LIVE NEWS

Nov 15, 2022
उद्यापासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. 15 : मुंबईत उद्या बुधवार दि.16 नोव्हेंबर आणि गुरूवारी (दि.17 नोव्हेंबर) रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू), येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श.का. काकड यांनी दिली आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, ग्रंथप्रेमींना विविध ग्रंथ एकाच ठिकाणी प्राप्त व्हावेत. तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेते यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्य सांस्कृतिक धोरण-2010 अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

यानिमित्ताने ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन व विक्री, चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्यान, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथप्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. काकड यांनी केले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed