• Sat. Sep 19th, 2026

मालाड येथील प्रस्तावित शासकीय रुग्णालयाचे काम महिनाभरात सुरू करा – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

ByMH LIVE NEWS

Oct 19, 2022
मालाड येथील प्रस्तावित शासकीय रुग्णालयाचे काम महिनाभरात सुरू करा – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबईदि. 19 : मालाड येथे शासकीय रुग्णालयाचे प्रस्तावित काम मुंबई महापालिकेने एका महिन्याच्या आत सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले

पीनॉथ वॉर्डमालाड (पश्चिम) येथे आज पार पडलेल्या पालकमंत्री आपल्या भेटीला‘ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टीआमदार अतुल भातखळकरराजहंस सिंगनगरसेवक जयातिवानाविनोद मिश्रागणेश खानकर यासह विभागाचे अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले कीसिटी सर्व्हे नंबर १९७ मध्ये प्रस्तावित शासकीस रूग्णालय होणार आहेत्याबाबत मुंबई महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी. मालाड येथील एम. एच. बी. कॉलनी येथे रेशनिंग दुकानामध्ये अनधिकृत धान्य विक्री होत असल्याच्या तक्रारीची चौकशी करून त्यावर तातडीने कारवाई करावी. मालाड परिसरात रोहिंगे यांची संख्या वाढत असून शासनाने यावर तोडगा काढावा या तक्रारीबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी नागरिकांनी ४५२ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले. तर यामधील ९६ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या

*****

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed