Crime News : तरुणीच्या भावाने आठवडाभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ‘कमल खरात’ या नावाने मुलीचे एक बनावट खाते तयार केले. या खात्यावरुन त्याने हर्षदशी संवाद साधत त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : नात्यातील एका मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून, चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हर्षद प्रकाश हुंदळेकर असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, आरोपींनी त्याला इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्याची हत्या केली. या घटनेने संपूर्ण चंदगड तालुक्यासह सीमाभागात मोठी खळबळ उडाली आहे.
बनावट इन्स्टाग्राम अकाउंटचा ‘हनी ट्रॅप’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदचे मुख्य संशयित कीर्तीकुमार कुट्रे याच्या चुलत बहिणीशी प्रेमसंबंध होते. या संबंधाचा राग मनात धरून कीर्तीकुमारने हर्षदचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आठवडाभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ‘ कमल खरात ‘ या नावाने मुलीचे एक बनावट खाते तयार केले. या खात्यावरुन त्याने हर्षदशी संवाद साधून त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. शनिवार, 29 ऑगस्ट रोजी रात्री याच बनावट खात्याच्या माध्यमातून त्याला पार्ले (ता. चंदगड) येथील एका निर्जनस्थळी भेटीसाठी बोलावून घेण्यात आले.
Dr Rupnawar Phaltan : अडीच दिवसांनंतर डॉ. रूपनवरांवर आजोळी अंत्यसंस्कार, बॉडी फलटणमध्ये आणताच संतप्त जमावाचा रूग्णालयात घुसण्याचा प्रयत्न
एकट्याला बोलावून केली निर्घृण हत्या
शनिवारी रात्री हर्षद आपल्या एका मित्रासह दुचाकीवरून पार्ले येथे पोहोचला. मात्र, तिथे गेल्यावर त्याला ‘तू एकटाच ये’ असा मेसेज पुन्हा त्याच बनावट खात्यावरून आला. त्यामुळे हर्षदने आपल्या मित्राला तिथेच थांबवून पुढे एकटाच गेला. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या कीर्तीकुमार रामू कुट्रे (वय 28), दिलीप उर्फ लहू लक्ष्मण कुट्रे (वय 29) आणि श्रीनाथ मधुकर नागुर्डेकर (वय 24) यांनी हर्षदवर अचानक हल्ला केला. हर्षदच्या डोक्यावर वर्मी घाव बसल्याने तो जागीच ठार झाला.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न फसला
खून केल्यानंतर संशयितांनी पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक भयानक कट रचला. त्यांनी हर्षदची बॉडी एका चारचाकी वाहनातून तिलारी येथील प्रसिद्ध स्वप्नवेल पॉईंटच्या खोल दरीत फेकून दिला. तसेच, त्याची दुचाकी बेळगाव येथे नेऊन ठेवली, जेणेकरून तो कोठेतरी निघून गेला आहे, असा भास निर्माण व्हावा.
आईच्या तक्रारीनंतर गुन्ह्याचा उलगडा
हर्षद घरी न परतल्याने त्याची आई योगिता हुंदळेकर यांनी सोमवारी रात्री पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या भीषण खुनाचा उलगडा झाला.
स्वप्नवेल दरीत थरारक शोधमोहीम
बुधवारी पोलिसांनी संशयितांना घेऊन स्वप्नवेल पॉईंटवर शोधमोहीम राबवली. मात्र, ही दरी अत्यंत खोल आणि तीव्र उताराची असल्याने शोध घेण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. दाट धुके आणि अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवशी यश आले नाही.
Crime News : उमाला हार्ट अटॅक आला की काय! खुर्चीत खिळलेल्या बायकोला पाहून पती घाबरला, दोनच मिनिटात गळा दिसला अन् धक्कादायक उलगडादरम्यान सावंतवाडी येथील बाबुलाल अलमेडा यांची रेस्क्यू टीम, ड्रोन, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने मृतदेहाचा शोध पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पोवार अधिक तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा