• Tue. Sep 1st, 2026

साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठारावर फुलोत्सवाला सुरुवात झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फुलोत्सावाचे लोकार्पण झाले. यंदा पर्यटकांना कास पठारावर प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्यक असणार आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : साताऱ्यातील जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील फुलोत्सवाला आजपासून (मंगळवारी) प्रारंभ झाला. कास पठारावर विकासकामांची बरसात करण्यात आली असून कास नव्याने उभारण्यात आलेल्या सोवेनियर शॉप, पर्यटक निवारा शेड तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले कास पठार वेगवेगळ्या प्रजातींच्या फुलांनी बहरून गेले आहे. प्रति दिन केवळ तीन हजार पर्यटकांना तर शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी केवळ ऑनलाइन बुकिंग असलेल्या पर्यटकांनाच प्रवेश मिळणार आहे.

दिवसाला केवळ 3 हजार प्रवाशांना प्रवेश

कास पठारावर आता चवर, तेरडा, सीतेची आसवे, गेंद, नभाळी, आभाळी कंदील पुष्प आणि कुमुदिनी फुलांना बहर येऊ लागला आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांना यंदाच्या फुलोत्सवाचे वेध लागले आहेत. पर्यटकांसाठी कास वन समिती सज्ज झाली आहे. पर्यटकांसाठी यंदापासून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, निसर्गसंपदेच्या धोका पोहोचू नये, या दृष्टीकोनातून दिवसाला केवळ तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी थेट येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

Maharashtra TimesEknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रिया

कास पठारावर प्रवेशासाठी बुकींग आवश्यक

कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाने ऑनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध केली आहे. http://www.kas.ind.in या अधिकृत संकेतस्थळावरून पर्यटकांना बुकिंग करता येईल. १२ वर्षांवरील पर्यटकांना २०० रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येईल. त्यात पार्किंग ते पठारापर्यंत बससेवा समाविष्ट आहे. शालेय सहलीसाठी प्रति विद्यार्थी ४० रुपये शुल्क भरावे लागेल. इलेक्ट्रिक वाहनासाठी १०० रुपये, गाइड शुल्क २०० रुपये प्रति तास (१ व्यक्ती ते १० जणांचा ग्रुप). यंदा पर्यटकांना एकीव व कुमुदिनी टेहळणी मनोऱ्यावरून (वॉच टॉवर) पुष्प पठाराचा नजारा डोळ्यात साठवता येणार आहे.

Kas Pathar

‘मंडपघळ’ यंदा मुख्य आकर्षण

कास पठारावरील पुष्प हंगामाच्या शुभारंभाला खासदार उदयनराजे भोसले हे वगळता पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दांडी मारली. दरम्यान पर्यटनाचा विस्तार पठारापुरता मर्यादीत न ठेवता परिसरातील नैसर्गिक स्थळांचा देखील विकास करण्यात येत आहे. निसर्गसौंदर्य व जैवविविधतेने नटलेले ‘मंडपघळ’ हे ठिकाण पर्यटकांसाठी यंदा मुख्य आकर्षण ठरणार आहे. पर्यटकांनी फुलांमध्ये पाय देऊ नये, कचरा करू नये, असे आवाहन सातारा वन विभाग आणि कास पठार संवर्धन समितीने केले आहे.

Maharashtra TimesTarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला

उदयनराजे काय म्हणाले?

पुष्प हंगाम शुभारंभदिनी कास पठार वन विभाग कार्यालयाचे देखील उद्घाटन झाले. कास पठारावर यंदा प्रथमच ‘हिरकणी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कास पठाराचे संवर्धन, पर्यटक व्यवस्थापन आणि शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

Kas Pathar

Maharashtra TimesManoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारची खलबतं; मंत्री, आमदारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठकयावेळी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती सुनील काटकर, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौन्धळ, दिगंबर जाधव, कराडच्या सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, साताऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, संतोष पाटील, पठार वन समितीचे सदस्य उपस्थित होते.