सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील खदखद समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेत ‘आयारामां’च्या चर्चेमुळे अंतर्गत असंतोष उफाळण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सोलापूर शहर आणि जिल्हा कार्यकारिणी बरखास्त होऊन तब्बल पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला असला, तरी अद्याप नव्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या कोणतीही निवडणूक नसली तरी संघटनात्मक पुनर्बांधणी आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने शहराला अद्याप पूर्णवेळ नेतृत्व मिळालेले नसतानाच, जिल्हा संपर्कप्रमुख खासदार धैर्यशील माने आणि खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नवी कार्यकारिणी गठीत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
मात्र, संभाव्य पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत आलेल्या नावांवरून पक्षात आता ‘निष्ठावंत विरुद्ध उपरे’ असा नवा अंतर्गत संघर्ष पेटण्याची दाट चिन्हे दिसू लागली आहेत. युवासेनेचा पदाधिकारी सुजित खुर्द यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांना संधी द्यावी, पक्षात नव्याने आलेल्यांना शिवसेना आधी कळावी, आणि त्यानंतर त्यांना मोठ्या पदावर विराजमान करावं, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी सुजित खुर्द आणि समी मौलवी यांनी केली आहे.
शिवसेनेत नवा फॉर्म्युला; तीन शहरप्रमुखांची नियुक्ती होणार
सत्ताधारी पक्ष असल्याने सध्या शिवसेनेत पदांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी उसळली आहे. अंतर्गत वाद शमवण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी संपूर्ण शहरासाठी एकाच शहरप्रमुखाची नियुक्ती करण्याऐवजी विधानसभा मतदारसंघनिहाय तीन स्वतंत्र शहरप्रमुख नेमण्याचा नवा फॉर्म्युला पक्षाने पुढे आणला आहे.
आयारामांना शहराध्यक्ष जबाबदारी देण्याबाबत नाराजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मनोज शेजवाल आणि त्यानंतर सचिन चव्हाण यांनी यापूर्वी शहरप्रमुख पदाची धुरा सांभाळली होती. नव्या त्रिस्तरीय फॉर्म्युल्यानुसार आता दक्षिण सोलापूरसाठी माजी उपमहापौर राजेश काळे, सोलापूर शहर मध्यसाठी नगरसेवक प्रियदर्शन साठे आणि सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी राजू आलूरे यांची नावे आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, यातील काही नावांना पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे.
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारची खलबतं; मंत्री, आमदारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठकज्या व्यक्तींचा भूतकाळात शिवसेनेशी कोणताही थेट संबंध किंवा योगदान राहिलेले नाही, अशा नव्याने पक्षात आलेल्या ‘आयारामां’ना जर थेट शहराच्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी दिली, तर पक्षासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून घाम गाळणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नेमकं काय करायचं? असा थेट सवाल तळागाळातील शिवसैनिकांमधून विचारला जात आहे.
अनुभवी वजनदार चेहऱ्यांना डावलल्याचा आरोप
नवख्यांना झुकते माप देऊन पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ केले तर पक्षसंघटनेला मोठे नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. विशेष म्हणजे सोलापूर शहरात पक्षाकडे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, मनीष काळजे यांसारखे प्रदीर्घ राजकीय आणि संघटनात्मक अनुभव असलेले वजनदार चेहरे उपलब्ध आहेत.
या ज्येष्ठ नेत्यांनी अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर पक्षसंघटन टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण काम केले आहे. असे अनुभवी नेतृत्व शहरात हजर असताना त्यांना डावलून किंवा दुय्यम स्थान देऊन नवख्या चेहऱ्यांवर मेहेरबानी दाखवली जात असल्याच्या भावनेने पक्षात नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.
शहर उत्तरसाठी इच्छुक; खासदार डॉ श्रीकांत शिंदेंची भेट घेणार
युवा सेनेचे पदाधिकारी सुजित खुर्द यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, शहर उत्तर मतदारसंघासाठी पक्षातील अनेक जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या होत्या. २०१४ पासून संगमेश्वर महाविद्यालयाचे शाखाप्रमुख ते थेट युवासेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदापर्यंत काम केले. पक्षाशी सातत्याने एकनिष्ठ राहिले तरीही संधी मिळत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली.
Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर, दोन पक्षांच्या गटनेत्यांमध्येच जोरदार राडा, नेमकं काय घडलं?सोलापूर शिवसेनेची पुढील संघटनात्मक दिशा ठरणार असून नाराजीचा हा स्फोट रोखणे खासदार धैर्यशील माने आणि खासदार ज्योती वाघमारे यांच्यासाठी मोठी राजकीय कसोटी ठरणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा