• Tue. Sep 1st, 2026

MPSC Paper Leak Case : मुंबई पोलिसांची जोरदार कारवाई, नंदुरबारमधून ऋतुजा पाटीलला अटक; औषध निरीक्षक पेपरफुटी तपासाला वेग

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर ऋतुजा पाटील हिला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास आता युद्ध पातळीवर पुढे सरकताना दिसत आहे. पेपरफुटी नेमकी कशी झाली? याचा लवकरच उलगडा आता होण्याची शक्यता आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकत आहे. मुंबई गुन्हे शाखेचे तपास पथक गेल्या सहा दिवसांत तिसऱ्यांदा नंदुरबारमध्ये दाखल झाले असून, यावेळी प्रकरणातील संशयितांना सोबत आणून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या कारवाईत नंदुरबार येथून ऋतुजा पाटील हिला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान संशयितांच्या हालचाली, त्यांचे परस्पर संबंध तसेच पेपरफुटीशी संबंधित संभाव्य साखळीचा शोध घेण्यावर गुन्हे शाखेचा भर आहे. तपास पथकाकडून नंदुरबारमधील संबंधित ठिकाणी चौकशी आणि पडताळणी केली जात असल्याने या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

गोपाल मराठे आणि कौटल्य अकॅडमीचे संबंध

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगात कार्यरत असलेले गोपाल मराठे यांच्या कथित सहभागामुळे तपासाला आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मराठे हे मूळचे नंदुरबारचे रहिवासी असून, ज्या कौटिल्य अकॅडमीच्या माध्यमातून पेपरफुटी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्या अकॅडमीचे ते माजी विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra TimesEknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रिया

गुन्हे शाखेकडून सविस्तर तपास सुरु

पेपरफुटी प्रकरणात गोपाल मराठे यांचा सहभाग समोर आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयोगातील त्यांची नेमकी भूमिका, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहितीपर्यंत त्यांना संभाव्य प्रवेश होता का, तसेच अन्य संशयितांशी त्यांचे नेमके संबंध काय होते, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

गु्न्हे शाखेची पुढची कारवाई महत्त्वाची

ऋतुजा पाटीलच्या अटकेमुळे या प्रकरणातील तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. तिच्या चौकशीतून पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गुन्हे शाखेच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

लव्हस्टोरीमुळे पेपरफुटी समोर

संबंधित पेपरफुटीचे प्रकरण सहजासहज समोर आले नसते. पण एका प्रेम प्रकरणामुळे हे प्रकरण उघडकीस आले. ऋतुजा पाटील हिचे वडील अमृत पाटील यांनी कौटील्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटील यांच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. प्रवीण पाटील याने एमपीएससीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन ती मिळवल्याची माहिती आहे.

Maharashtra TimesTarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबालाअमृत पाटील याने मुलगी ऋतुजाला तो पेपर दिला. तिने हा पेपर प्रियकर गौरव पाटील यालादेखील दिला. पुढे परीक्षा पार पडली. ऋतुजा पात्र ठरली तर गौरव पात्र ठरला नाही. या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि गौरवने ऋतुजाच्या विरोधात एमपीएससीत तक्रार केली. यानंतर त्याने ई-मेल करत आपण तक्रारीचा बनाव केल्याचंदेखील म्हटलं. याच प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सुरुवातीला ऋतुजाला केवळ नोटीस दिली होती. पण आता तिलादेखील अटक केली आहे.