Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून अमित ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
शिवाजी महाराजांच्या शेजारी मोदींचा फोटो पाहताच अमित ठाकरे भडकले, फोटो हटवल्याने भाजप आक्रमक(फोटो– Lipi)
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असून ते शहरातील विविध महाविद्यालयांना भेटी देत विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात भेटीसाठी गेले असता अमित ठाकरे यांचं आक्रमक रूप पाहायला मिळाले. अमित ठाकरे हे महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कार्लायलयात धडकले आणि विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाच्या मुद्द्यावरून त्यांनी प्राचार्यांना चांगलंच धारेवर धरलं. तसंच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थी प्रश्नावर बोलत असतानाच एका तरुणाने अमित ठाकरे यांचे लक्ष कार्यालयाच्या भिंतीकडे वेधले. या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. ही बाब लक्षात येताच अमित ठाकरेंनी तो फोटो हटवण्यास सांगितलं. या मुद्द्यावरून आता पुण्यातील राजकीय वातावरण तापलं असून पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याने भाजपकडून अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
“अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलं. ते मनसेचे नवे नवे झालेले नेते आहेत. फोटोबाबत हा प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉलच्या माध्यमातून हे सगळं होतं. ते शासकीय कॉलेज आहे. त्यांनी फोटो काढण्याच्या आधी प्रोटोकॉल वाचायला हवा होता. ते नव्याने घराच्या बाहेर पडले आहेत, घरात बसणाऱ्यांना प्रोटोकॉल माहिती नसतो. भारतीय पंतप्रधानांचा फोटो प्रत्येक शासकीय कार्यालयात असतो,” अशी भूमिका भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मांडली आहे.
भाजप शहराध्यक्षांचा हल्लाबोल
भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही अमित ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “एखाद्या महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला असेल तर तो लावण्यामागे काही वेगळा हेतू असेल असे मला वाटत नाही. आपल्या सगळ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तसेच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात आत्मीयता आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते संविधानिक पद आहे, त्यामुळे फोटो लावला म्हणून राजकारण करणे, हे योग्य नाही. मनसे चुकीच्या पद्धतीचे राजकारण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून तो प्रसिद्धी माध्यमांवर झळकवायचा आणि प्रसिद्धी मिळवायची हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, यातून मिळणारी प्रसिद्धी क्षणभंगुर असते,” असा टोला घाटे यांनी लगावला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा