मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात गणेशोत्सवात डीजेचा वापर करावा की नको याबाबत सुरु असलेल्या वादावर रोखठोक भूमिका मांडली. यासोबतच त्यांनी आपल्या भाषणात कॉक्रोच जनता पार्टीवरही टीका केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यात सध्या गणेशोत्सवात डीजे वाजवण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. अनेकांनी गणेशोत्सवात डीजे वाजवला जाऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. तर काही जणांनी डीजेवर बंदीच्या मागणीवर टीका केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या वादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. विशेष म्हणजे पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी डीजेच्या मुद्द्यावर भूमिका मांडली.
“गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही? हा प्रश्न नक्की मला विचारला जाईल. मी पुणेकरांना सांगू इच्छितो की, पुण्यामध्येच ही क्षमता आहे, संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे. हे फक्त पुणेकर करु शकतात. माझं पुणेकरांना आवाहन आहे, या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की, संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा होतो”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस यांची सीजेपीवर टीका
“सीजेपी हे जे नाव आहे तिला केवळ एक छोटीशी संघटना समजू नका. सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम आहे. या प्रोग्रमामध्ये तम्हाला जे चार-पाच तरुण दिसत आहेत ते नाहीत. हे फक्त मोहरे आहेत. सीजेपीच्या बैठकांमध्ये कोण आहेत? भारत जोडोच्या त्याच 180 संघटना आहेत, ज्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या विरोधात नरेटिव्ह तयार केला. यावेळी नवीन नाव घेऊन ते आपल्या विरोधात मैदानात उतरत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केला.
NCP Party Meeting : ‘देवगिरी’ बंगल्यावर खल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी“आपल्याला माहिती आहे, रामायनात काल होता. तो काल वेगवेगळे वेष घ्यायचा. तो कधी साधूचा तर कधी सामान्य माणसाचा वेष घ्यायचा. वेगवेगळ्या वेषात तो राक्षसी इरादे घेऊन जायचा. पण ज्यावेळेस प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं तर काल देखील जिंकू शकला नाही. आम्ही केवळ रामाचं नाव घेणारे नाहीत. प्रभू श्रीरामांनी जी तत्वे दिली आहेत त्याप्रमाणे राज्य कारभार चालवण्याचा प्रयत्न करणारी आहोत. त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो, कार्यपद्धतीतला बदल समजून घेतला पाहिजे”, असं आवाहन त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं.
“सध्या कम्युनिकेशनचं माध्यम बदललं आहे. आपली युवा पिढी टीव्ही चॅनल पाहत नाहीत आणि पेपरही पाहत नाहीत. त्यांचं सर्व लक्ष मोबाईल फोनवर आहे. त्यामुळे प्रत्येक चॅनलची व्हिवरशिप ही डिजीटल प्लॅटफॉर्मवर जास्त आहे. जे 40 ते 60 सेकंदची बातमी बनवतात त्याच जास्त लोकांपर्यत पोहचतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आता लोकांपर्यंत बातमी पोहोचवण्याचं माध्यम फेसबुक किंवा व्हाट्सअप राहिलेलं नाही. आज सोशल मीडियामध्ये 40 टक्के ट्राफीक एकट्या इन्स्टाग्रामवर आहे.”
Crime News : सकाळचे साडेनऊ वाजलेले, महिलेला अचानक फोन, हुज्जत घालत शिवीगाळ, उचलून नेण्याची धमकी, जळगावच्या तरुणावर गुन्हा“आपल्यापैकी 90 टक्के लोकं अजून फेसबुकवरच अडले आहेत. फेसबुकवर आलेली आपली बातमी आपण स्वत: वाचून अतिशय आनंदी होतो. मला अनेक लोकं सांगतात की, भाऊ फेसबुकवर शेअर केलं. फेसबुकही महत्त्वाचे आहे. सगळी माध्यमे महत्त्वाची आहेत. पण फेक नरेटिव्हचा मुकाबला करायचा असेल तर अस्त्र आणि शस्त्रही तीच लागतील आणि कार्यपद्धती सुपिरियर लागेल.”
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा