• Mon. Aug 31st, 2026

Thane News:ठाण्यात रविवारी ३२ वी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यावेळी तीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,लता शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी देखाल सहभाग नोंदवला होता.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी,ठाणे :तब्बल सहा वर्षांनी ठाणे महानगरपालिकेत महापौर,पदाधिकारी व नगरसेवक विराजमान झाल्यानंतर रविवारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. या स्पर्धेत अबालवृद्धांनी सहभागी होत धावण्याचा आनंद घेतला.

३० हजार स्पर्धकांचा सहभाग

स्पर्धेत सुमारे ३० हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पुरुष गटात कोल्हापूरचा प्रवीण कांबळे,तर महिला गटात नाशिकची रवीना गायकवाड यांनी अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे,स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजप आमदार संजय केळकर व सिनेकलाकारांनी स्पर्धेत धाव घेतली.

‘धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची’

‘धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची’ या घोषवाक्यासह ३२ वी ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्पर्धेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या ,तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवल.त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण १४ गटांतील स्पर्धेचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला.

धावपटूंचा गौरव

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाजप आमदार संजय केळकर व इतर लोकप्रतिनिधींसह मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. महापौर शर्मिला पिंपळोलकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक , खासदार नरेश म्हस्के , आमदार रवींद्र फाटक,आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले.

तारे – तारकांची हजेरी

स्पर्धेत सिनेकलावंत मंगेश देसाई, गश्मीर महाजनी ,किशोरी आंबिये, ऐश्वर्या नारकर, अभिज्ञा भावे , हरीश थोरात, स्वराज नागांवकर, शिवानी सोनार, विजया बाबर, निखिल दामले, रोहित परशुराम, ट्विंकल यादव, दक्षता जुईल, अनुज साळुंखे , प्रतीक्षा शिवणकर , तनुष्का विशेल ,चेतन गौरव,समीर परांजपे आणि अनघा ठाकूर उपस्थित होते. कलाकारांनी स्पर्धेकांचा उत्साह वाढवत एक किलोमीटर स्पर्धेत सहभाग घेतला.

Maharashtra TimesNepal Flood : डॉ. चितळेंच्या ग्रुपसोबत नेपाळला गेलेले आई-वडील बेपत्ता, लेकीला अश्रू अनावर, रडतच परीक्षा दिली

ठाण्यातील खेळाडूंचा सत्कार

जागतिक स्तरावरील ३८ व्या चिन्मय स्विम मॅरेथॉन २०२६ ,झुरिक लेक रिले पद्धतीने ८ तास ७ मिनिटांत पूर्ण करणाऱ्या आयुषी आखाडे , समीप्ता वाव्हळ , सुयश हिंदळेकर, प्रशिक्षक कैलास आखाडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जलतरण प्रकारात श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारे उदय उतेकर, ठाणे मॅरेथॉन स्पर्धेसाठी दरवर्षी योगदान देणारे रमेश खारकर, पंच म्हणून काम पाहणारे सुनील होनमाने,संतोष वायगणकर , तसेच यूपीएससी स्पर्धा परीक्ष उत्तीर्ण करून भारतीय नौदलात वर्ग -१ अधिकारी म्हणून निवड झालेल्या ज्ञानेश आव्हाड यांचाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Maharashtra TimesWeather Forecast: पावसाने टेन्शन वाढवलं; ऑगस्टमध्ये ओढ दिली अन् आता सप्टेंबरमध्येही सरासरीहून कमीच कोसळणार, IMD चा ताजा अंदाज

लाखोंच्या बक्षिसांची लयलूट

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध १४ गटांत झाली. विजेत्यांना ११ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. २१ कि.मी . स्पर्धेतील विजेत्यास एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा