Eknath Shinde Parbhani Visit: मराठा समाजाच्या प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे आम्ही नेहमीच स्वागत केले आहे. इतरांचे हक्क न काढता मराठा समाजातील शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सनदशीर मार्गाने सोडवून न्याय दिला जाईल, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आपण स्वतः यापूर्वी दोन वेळा चर्चा करून मुख्यमंत्री असताना स्वतंत्र १४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मंत्र्यांना पाठवून चर्चा सुरू ठेवली असून सरकार तोडगा काढण्यास कटिबद्ध आहे.’ ‘महायुती सरकारने २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना व गोरगरिबांना शिक्षणात सवलती व मोठे आर्थिक साह्य दिले आहे,’ असे ते म्हणाले.
Eknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्ययुवकांची घोषणाबाजी
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरू होताच काही युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, ‘हे युवक आपलेच आहेत, त्यांना मंचावर चर्चेसाठी बोलवा,’ असे सांगत शिंदे यांनी वातावरण शांत केले. खासदार संजय जाधव यांनीही शांततेचे आवाहन केले. दरम्यान, कार्यक्रम स्थळाबाहेर ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Bandu Jadhav : ‘माणूस खास, असली शिवसेना मे आया बंडू बॉस’, एकनाथ शिंदे यांची परभणीत डायलॉगबाजीजाधव यांचा माफीनामा
परभणी दोन महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घ्यावयाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. एकदा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. अशा परिस्थितीत पुन्हा ऐन वेळी कार्यक्रम रद्द करा असे सांगितल्यानंतर मी येणाऱ्या लोकांना काय उत्तर देणार, असे सांगून खासदार संजय जाधव यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभेत माफी मागितली. ‘कार्यक्रम रद्द करणे शक्यच नव्हते, त्यामुळे भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो,’ असे खासदार जाधव यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी आयोजित मेळावा रद्द करावा, अशी सूचना सकाळी ११ वाजता मनोज जरांगे यांनी आयोजक खासदार जाधव यांना केली होती.
