• Mon. Aug 31st, 2026

Nepal Flood Emotional Story of Tourists Returning: नेपाळहून आलेल्या पर्यटकांचे रविवारी पहाटे नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यावेळी घरी परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘नागपुरातील पर्यटक श्रीधराचार्य स्वामी महाराज यांच्या समूहासोबत २२ ऑगस्ट रोजी काठमांडूला गेले होते. कथा आणि धार्मिक स्थळांचे दर्शन आटोपून परतीची तयारी सुरू असतानाच नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे रस्ते बंद झाले. वाहनांची व्यवस्था करून पैसेही दिले होते; मात्र मार्गच बंद झाल्याने पर्यटकांची अडचण वाढली. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवासारखे धावून आले आणि आम्ही सुखरूप नागपुरात पोहोचलो’, अशी भावना रविवारी पहाटे परतलेल्या पर्यटकांनी व्यक्त केली.

तिबेटला लागून असलेल्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांत २६ ऑगस्ट रोजी पहाटे आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये विध्वंस झाला, तर अनेकांचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर नागपुरातील १०६ पर्यटकांचा परतीचा मार्ग बंद झाला. पुढे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. पैसेही संपत आले होते. या वेळी समूहातील सुनंदा गावंडे यांनी आमदार प्रवीण दटके यांच्याशी संपर्क साधला. दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली.

Maharashtra TimesNepal Flood : ‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो’; नेपाळमधून 37 जणांचा गृप मुंबईत परतला, पोहोचताच कुटुंबीयांना पाहून ढसाढसा रडले, भयावह आपबिती सांगितलीयानंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांशी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधून धीर दिला. स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांना मदतीसाठी पाठविण्यात आले. पर्यटकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मध्यस्थीने परतीची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना बसने दानापूरपर्यंत आणण्यात आले. तेथून रेल्वेने नागपूरकडे रवाना करण्यात आले.

‘शनिवारी सकाळी ७.३० वाजता आम्ही पटण्याहून ट्रेनने निघालो आणि रविवारी पहाटे ४.३० वाजता सुखरूप नागपुरात पोहोचलो’, असे श्रीधराचार्य स्वामी महाराज यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. चार पर्यटक शुक्रवारीच नागपुरात परतले होते.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: मुस्लिम नकोसे असणारा खरा हिंदू नाही; मोहन भागवतांची अमेरिकेत भूमिका, फडणवीसांनीही केलं समर्थन, हिंदुत्वाविषयी काय म्हणाले?ज्येष्ठ महिलेवर काठमांडूत उपचार
या धार्मिक पर्यटनादरम्यान नरेंद्रनगर येथील निर्मला पांडे यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीमुळे त्यांना परत आणणे शक्य नसल्याने त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत. त्यांचा नातू विमानाने काठमांडूला पोहोचला असल्याचे श्रीधराचार्य स्वामी महाराज यांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा