• Sun. Aug 30th, 2026

Lasalgaon Onion : कोट्यवधींचा कांदा गोदामातच सडला; लासलगावात सरकारी कांद्याला दुर्गंधी, साठवणुकीच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून १५ मेपासून दोन लाख टन कांदा खरेदीची मोहीम हाती घेतली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेला कांदा सडल्याचे धक्कादायक वास्तव लासलगाव येथे समोर आले आहे. मनमाड रोडवरील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर कांदा सडला असून, किडे-अळ्या लागलेल्या कांद्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. सडलेल्या कांद्यातून काळपट, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने बफर स्टॉकला बफर शॉक बसल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed