Surgana Crime: सुरगाणा तालुक्यात मध्यरात्री घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याची नातू अन् नातसुनेनं हत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सखाराम गावित (वय ६६) आणि बायजाबाई गावित (वय ६३, रा. केळुणे) हे घरात झोपलेले असताना मंगळवारी (दि. २५) रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
Nagpur Crime : पतीचं निधन, पदरी दोन मुलं; लग्नाच्या आमिषाने 26 वर्षीय महिलेवर अत्याचार, महाराष्ट्रातील राज्यमंत्र्याच्या बॉडीगार्डवर गुन्हाही घटना बुधवारी (दि. २६) सकाळी उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. पोलिस पाटील बापूराव भोये यांनी सुरगाणा पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रशांत अहिरे, पोलिस उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले.
ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
Jalgaon News: रक्षाबंधनापूर्वीच दोन कुटुंबांवर शोककळा; बापलेकाचा बुडून, तर तरुणाचा विजेच्या धक्क्याने करुण अंत, जळगाव हळहळलं…या कारणामुळे टोकाचे पाऊल
तपासादरम्यान पोलिसांनी मृतांचे नातू देवीदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देवीदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोघांनीही संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत दाम्पत्य दररोज मद्यपान करून शिवीगाळ व वाद घालत असल्याने घरात सतत तणावाचे वातावरण निर्माण होत होते. रोजच्या कटकटीला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी हत्या केल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले.
Nepal Flood : साहसी गिर्यारोहक डॉ. चितळेंसह 61 जणांचा ग्रुप बेपत्ता, मानसरोवर यात्रेवेळी संपर्क तुटला, क्लिनिकबाहेर नोट वाचून रुग्ण हवालदिलओझरमध्ये तरुणाचा गळा आवळून खून
ओझरमधील कासागल्ली परिसरात एका तरुणाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. विनोद विष्णू शेंद्रे (वय ३४, रा. बाजारपेठ, ओझर) असे तरुणाचे नाव आहे. कासागल्ली येथे अमोल पावटे यांच्या भाड्याने दिलेल्या घरात विनोद शेंद्रेचा मृतदेह आढळला. बुधवारी (दि.२६) रात्री साडेदहा वाजेपासून ते गुरुवारी (दि.२७) सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या काळात दोरीने विनोदचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज आहे. विनोद हा मूळचा कळमगाव, तालुका यवतमाळ येथील असून, तो ओझर येथे एका किराणा दुकानात काम करीत होता. या प्रकरणी मित्र रवींद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विनोदसोबत खोलीत राहणारा त्याचा मित्र परागंदा झाल्याची माहिती आहे.
