• Fri. Aug 28th, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026

नाशिक, दि. २८ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत ५० ई-बसेसचे नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहेत. या बसेसच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२ मीटर लांबीच्या ५० ई-बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक ई-बसेसचा समावेश झाल्यामुळे नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही हातभार लागणार आहे.

डिझेल बसेसच्या तुलनेत ई-बसेसच्या वापरामुळे परिचालन खर्चातही बचत होणार आहे. नाशिक शहराचा विकास आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यात आणखी बसेस उपलब्ध होणार असून त्यातून नागरिकांना अधिक व्यापक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed