Amravati Hospital NICU Fire : अमरावती जिल्ह्या स्त्री रुग्णालयात झालेली आगीची घटना म्हणजे भूतकाळाची पुनरावृत्ती आहे. तीन वर्षापूर्वी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग लागून एका बालकाचा त्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ही इमारत नव्याने आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नवी इमारत बांधण्यात आली.पण नव्या इमारतीतही हाच प्रकार पुन्हा घडला .
सर्व काही अद्ययावत असतानाहीएवढी मोठी आग कशी लागली
जिल्हा स्त्री रुग्णालयाची नवीन इमारत अवघ्या वर्षभरापूर्वीच सेवेत दाखल झाली. येथील वायरिंग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन लाइन आणि अन्य साहित्य नवीन आहे. सर्व काही अद्ययावत असतानाही पहाटेच्या सुमारास एवढी मोठी आग कशी लागली, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन प्रश्न ऐरणीवर
वर्षभरातच नव्या इमारतीत भीषण दुर्घटना घडल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. इमारत उभारताना इलेक्ट्रिकल कामात किंवा वायरिंगमध्ये काही गंभीर दोष होते का, नवीन उपकरणांची नियमित तपासणी आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाले का, फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन केवळ कागदावरच झाले होते का, अशी विचारणा होत आहे.
चिमुकल्यांचा बळी
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक दोषांमुळे हा अपघात झाला की प्रशासकीय हलगर्जीमुळे तीन निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला, याचा शोध घेतला जात आहे.
उपचाराचा खर्च सरकारकडून
जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत उर्वरित ३६ चिमुकल्यांचा जीव वाचवला.या सर्व बालकांना सुरक्षित बाहेर काढून शहरातील सरकारी आणि विविध खासगी रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आलेल्या एकाही बालकाच्या पालकांकडून वैद्यकीय अपचाराने कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये.
Amravati Fire : बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहो
प्रशासनाच्या या तातडीच्या निर्णयामुळे भयभीत पालकांना दिलासा
या सर्व बालकांच्या वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी दिल्या आहेत. सध्या या बालकांना शहरातील पीडीएमसी , सुपर हॉसिपिटल , मुरके हॉस्पि़टल, पारिजात हॉस्पिटल आणि होप हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्याव उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या या तातडीच्या निर्णयामुळे भयभीत पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Nagpur Chlorine Gas Leak: क्लोरिन गळतीने गुदमरले गोधनी! जलशुद्धीकरण केंद्रातून पसरला विषारी वायू; 56 बाधित, 8 जण अतिदक्षता विभागात
जखमी बालकांना हलविण्यात आलेली रुग्णालये
. डॉ,.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय :११ बालके
. सुपर हॉस्पिटल :५ बालके
. डॉ. मुरके बालरुग्णालय : ८ बालके
. पारिजात हॉस्पिटल :२ बालके
. होप हॉस्पिटल : ६ बालके
