• Sun. Aug 23rd, 2026

Khavdya Dongar : ‘आयफोनचा काहीही संबंध नाही, कुणालला असं करायचंच नव्हतं’; वादामागचं जुनं कारण समोर, आजोबांनी सांगितली धक्कादायक वस्तुस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Khavdya Mountain Accident Sangita Chandgude Father Reaction : ‘हा कोणताही पूर्वनियोजित कट किंवा आत्महत्या नव्हती, तर कौटुंबिक वादातून निर्माण झालेला तणाव आणि दुर्दैवी अपघाताचं ते भयानक स्वरूप होतं’. हेच आजोबांच्या या स्पष्टोक्तीवरून सिद्ध होत आहे.

खवड्या डोंगर मृत्यू प्रकरण आजोबांजी प्रतिक्रिया(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या चांदगुडे कुटुंबाच्या तिहेरी मृत्यूप्रकरणाला आता एक अत्यंत महत्त्वाचं आणि खळबळजनक वळण लागलं आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘आयफोन’च्या अफवा आणि आत्महत्येच्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावत, मयत संगीता चांदगुडे यांचे वडील आणि कुणालचे आजोबा बबनराव पाटील यांनी घटनेची खरी पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. ‘मुलाला आत्महत्या करायचीच नव्हती, केवळ बाप-मुलाचा तोल गेल्यानं ही दुर्घटना घडली’, असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे.

आयफोन हे कारणच नाही; खरा वाद आत्याशी बोलण्याचा

सोशल मीडियावर आयफोन न मिळाल्यानं कुणालनं हे पाऊल उचललं, असा दावा केला जात होता. यावर बोलताना आजोबा बबनराव पाटील म्हणाले, ‘आयफोनमुळे हे घडलं हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता. गेल्या महिना-दीड महिन्यापासून बाप-मुलामध्ये वाद सुरू होता, पण त्यांच्यात एकमेकांवर जितका राग होता, तितकाच प्रचंड जीवही होता’, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Maharashtra TimesKhavdya Dongar Case : सत्य माहीत नसताना निव्वळ व्ह्यूजसाठी खोट्या गोष्टी पसरवल्या; संगीता चांदगुडे यांच्या बहिणीचा संताप

17-18 वर्षांपासून कुणालशी अबोला

त्यांनी वादाचं मूळ कारण सांगताना स्पष्ट केलं की, ‘दीड महिन्यापूर्वी माझ्याजावयाच्या (मुरलीधर) बहिणीच्या मुलाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून माझे जावई त्यांच्या बहिणीकडे जास्त राहत होते. मात्र, आत्या गेल्या 17-18 वर्षांपासून कुणालशी बोलत नव्हती, त्यामुळे कुणालला तिथे जाणं आवडत नव्हतं. ‘तू माझ्या बहिणीशी बोल, असा वडिलांचा आग्रह होता. तर ज्या आत्याने इतकी वर्षे संवाद ठेवला नाही, तिच्याशी मी बोलणार नाही’ ही कुणालची भूमिका होती. यावरूनच बाप-मुलात अढी निर्माण झाली होती’.

‘आत्महत्येचा उद्देश नव्हता; 10 मिनिटे दम धरला असता तर…’

घटनेच्या त्या दुर्दैवी क्षणाबद्दल सांगताना बबनराव पाटील भावूक झाले. ते म्हणाले की, ‘कुणालचा त्याच्या आईवर आणि वडिलांवर खूप जीव होता. त्याला आत्महत्या करायचीच नव्हती. जर त्याला जीव द्यायचा असता, तर त्याने तीन तासांपूर्वीच ते पाऊल उचललं असतं. बाप-मुलातील दुरावा कमी व्हावा आणि संवाद व्हावा यासाठीच तो तिथपर्यंत गेला होता. संगीताचे (आई) ऐकून कुणाल पुढे आलाही असता; पण दुर्दैवाने कुणालला पकडण्याच्या गडबडीत दोघांचा तोल बिघडला. वडिलांनी फक्त 10 मिनिटे दम धरला असता, तर ही दुर्दैवी वेळ आली नसती’.

Maharashtra TimesSangita Chandgude : खवड्या डोंगरावरुन जीव गमावणाऱ्या संगीता चांदगुडे यांचा व्हिडीओ व्हायरल, प्रेम आणि नात्याबद्दल भावनिक भाष्य

अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर

कोणतीही शहानिशा न करता सोशल मीडियावर चित्रविचित्र दावे करणाऱ्यांना बबनराव पाटील यांच्या या विधानाने चपराक लगावली आहे. ‘हा कोणताही पूर्वनियोजित कट किंवा आत्महत्या नव्हती, तर कौटुंबिक वादातून निर्माण झालेला तणाव आणि दुर्दैवी अपघाताचं ते भयानक स्वरूप होतं’. हेच आजोबांच्या या स्पष्टोक्तीवरून सिद्ध होत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा