Mumbai Bhuleshwarcha Raja Two People Death : या अपघातात ‘भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चे तरुण अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन लहान मुलींसह पाच जण जखमी झाले आहेत.
एक मोठी अपडेट समोर
शनिवारी, रात्री झालेल्या भुलेश्वरचा राजाची मूर्ती कोसळल्यानंतर तातडीनं पोलिसांनी यंत्रणा कामी लावली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घडलेल्या भीषण अपघाताप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. सुरुवातीच्या तपासानुसार, मूर्तीचा भार तोलणाऱ्या क्रेनचे नटबोल्ट तुटल्यानं अपघात झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळेच हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत होतं. आता, भुलेश्वरमधील अपघाताच्या तपासात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Panjabrao Dakh Weather Forecast : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस एन्ट्री मारणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
तपासात कोणती नवी माहिती?
पोलिसांच्या तपासानुसार, केवळ नटबोल्ट तुटले नव्हते, तर क्रेन आणि सपोर्ट सिस्टीममधील मुख्य वेल्डिंगही अचानक तुटल्याचं तपासात उघड झालं आहे. या नव्या तांत्रिक त्रुटीमुळे अपघाताचे गांभीर्य आणि क्रेन मालकाचा निष्काळजीपणा अधिकच स्पष्ट झाला आहे.
वेल्डिंगमधील त्रुटी पडली महाग
मुंबईतील अतिउंच गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन करताना मूर्तीचा तोल सांभाळण्यासाठी तसेच तिला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष लोखंडी सपोर्ट आणि वेल्डिंगचा वापर केला जातो. भुलेश्वरच्या राजाच्या मूर्तीसाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रक्चरमध्ये क्रेनच्या जोडणीजवळ वेल्डिंग करण्यात आलं होतं. मात्र, हे वेल्डिंग अचानक तुटलं. वेल्डिंग तुटल्यानं नटबोल्टवरील दाब वाढला आणि तेही तुटलं असावं. ज्यामुळे २७ फुटांची भव्य मूर्ती थेट कार्यकर्त्यांवर कोसळली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Khavdya Dongar Case : सत्य माहीत नसताना निव्वळ व्ह्यूजसाठी खोट्या गोष्टी पसरवल्या; संगीता चांदगुडे यांच्या बहिणीचा संताप
मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू
दरम्यान, भुलेश्वरच्या राजाची ही मिरवणूक भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेनं निघाली होती. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडप अवघ्या 50-60 मीटर अंतरावर बाप्पाची मूर्ती आली होती. याचदरम्यान 22 फूट मूर्तीचा तोल गेला. त्याखाली मंडळातील काही कार्यकर्ते दबले गेले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींची नावे संकेत नेवशे (वय 33) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय 30) अशी आहेत. या दोघांना रुग्णालयात आणलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. जखमी झालेल्या पाच जणांमध्ये 5 आणि 7 वर्षे वयाच्या दोन मुलींचा समावेश होता. जखमींवर जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हृदयद्रावक बाब म्हणजे, या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचा मृत्यू झाला आहे.
