१८ अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक जारी
पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलिस सहआयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.ठाणे पोलिस आयुक्तालयातील विविध वाहतूक उपविभागांसठी १८ अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आले आहेत. चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट, फॅन्सी अथवा नियमबाह्य नंबर प्लेट, नो- पार्किंगमध्ये वाहन उभे करणे,डबल पार्किंग किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्याची माहिती संबंधित वाहतूक उपविभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवविता येणार आहे.
वाहनावर ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येणार
प्राप्त तक्रारीतील छायाचित्रे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी तक्रारींची पडताळणी करतील.नियमभंग झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित वाहनावर ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
Sanjay Raut: भाजप अस्वस्थ, मोदी-शाह यांना विरोधी बाकांवर बसावं लागेल; राहुल गांधींच्या एण्ट्रीआधी पुण्यातून संजय राऊतांचा हल्लाबोल
वाहतूक शाखेचे आवाहन
आता नागरिकांचा कॅमेरा आणि पोलिसांची कारवाई या माध्यमातून नियमभंगकरणाऱ्यांवर तत्परतेने कारवाई होणार आहे. सुरक्षित ,आणि सुरळीत वाहतुकीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.
सुस्पष्ट छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन
मोबाइलद्वारे तक्रार करताना नागरिकांनी शक्यतो किमान तीन सुस्पष्ट छायाचित्रे पाठवावीत. विशेषत: वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसेल,अशा पद्धतीने फोटो काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तक्रारीसोबत वाहन क्रमांक, घटनास्थळ आणि नेमका वाहतूक नियमभमग याची माहिती देणेही आवश्यक असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले
Accident News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोगद्यात ट्रॅव्हल बसची चार वाहनांना धडक; विचित्र अपघातात १० जण जखमी
व्हॉट्सअॅप क्रमांक खालीलप्रमाणे
.ठाणेनगर युनिट -८६५५६५४१७१
. राबोडी -८६५५६५४१७२
.नौपाडा – ८६५५६५४१७३
.कळवा-८६५५६५४१७४
.कोपरी-८६५५६५४१७६
.वागळे-८६५५६५४१७७
.कापुरबावडी-८६५५६५४१७८
.वडवली -८६५५६५४१७९
.भिवंडी-८६५५६५४१८०
.कोनगाव -८६५५६५४१८१
.नारपोली- ८६५५६५४१८२
.कल्याण -८६५५६५४१८३
. डोंबिवली -८६५५६५४१८४
. कोळसेवाडी-८६५५६५४१८५
.उल्हासनगर-८६५५६५४१८६
.विठ्ठलवाडी -८६५५६५४१८७
. अंबरनाथ- ८६५५६५४१८८
