छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणाला वाचवत असताना वडिलांचा दरीत तोल गेला. मुलगा आणि पतीला दरीत कोसळत असल्याचं पाहून आईने देखील स्वत:ला दरीत झोकून दिलं. यामुळे एकाच कुटुंबाचा करुण अंत झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : बाळा खाली ये रे, हात जोडते तुझ्या पाया पडते… तीन तास डोंगराच्या धोकादायक कड्यावरून एक आई आणि बाप आपल्या १९ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी हंबरडा फोडत विनवणी करत होते. पण काळाचा फेरा एवढा क्रूर ठरला की, लेकाला वाचवण्यासाठी धावलेल्या बापाचा तोल गेला अन् दोघांसह आईनेही दरीत झेप घेतली! तिसगाव शिवारातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळपासून दुपारपर्यंत चाललेला हा थरार अखेर तीन निष्पाप जीवांच्या करुण अंताने थांबला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर आणि वाळूज परिसर सुन्न झाला आहे.
मुरलीधर दामोधर चांदगुडे (वय ४८), संगिता मुरलीधर चांदगुडे (वय ४२) आणि कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय १९) अशी एकाच चितेवर अंत्यसंस्कार झालेल्या दुर्दैवी आई-बाप आणि मुलाची नावे आहेत. हे कुटुंब झाल्टा फाटा परिसरातील अक्षयबन सोसायटीसमोर राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षांचा कुणाल सकाळी १० वाजेच्या सुमारास खवड्या डोंगराच्या अत्यंत धोकादायक कड्यावर आत्महत्येच्या विचाराने जाऊन उभा राहिला होता. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस, अग्निशमन दल, माजी सरपंच संजय जाधव आणि पोलीस कर्मचारी सुरेश भिसे आणि मंगेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन तास सलग सर्वांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. आई संगिता हात जोडून डोळ्यांत अश्रू आणून मुलाला खाली येण्याची विनवणी करत होती. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर कुणाल काहीसा शांत होताना दिसत होता.
‘त्या’ एका सेकंदात संसार मातीत मिळाला
कुणाल शांत होत असल्याचे पाहून वडील मुरलीधर यांनी त्याला पकडण्यासाठी पुढे पाऊल टाकले. मात्र, डोंगराच्या निसरड्या कपारीवर उभ्या असलेल्या कुणालला पकडताना मुरलीधर यांचा तोल गेला अन् ते कुणालसह थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळले! आपल्या डोळ्यांसमोर पती आणि पोटचा गोळा दरीत कोसळताना पाहताच आई संगिताची शुद्ध हरपली; काहीही विचार न करता तिनेही मुलाच्या दिशेने दरीत स्वत:ला झोकून दिले!उपस्थित पोलीस आणि जवानांनी तात्काळ बचावकार्य राबवून तिघांनाही बाहेर काढून घाटी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिघांनाही मृत घोषित केले.
किरकोळ वादातून संसार उद्ध्वस्त
कुणालचा त्याच्या वडिलांशी किरकोळ खर्चाच्या पैशांवरून आणि बँकेचा हप्ता बाऊन्स झाल्यावरून वाद झाला होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र, अवघ्या १९ वर्षांच्या मुलाच्या एका रागाने संपूर्ण हसता-खेळता संसार एका क्षणात खाक केला. मुलाच्या प्रेमापोटी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या या आई-वडिलांच्या दुर्दैवी अंताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा