शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईक मोठा धक्का बसला आहे. कारण माजी आमदार तथा माजी महापौर राहिलेल्या ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जिल्हाधिकारी कार्यालयातून रद्द करण्यात आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका तथा मुंबई महापालिकेच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. पण त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा विषय अजून मुंबई महापालिका सभागृहात आलेला नाही. त्यामुळे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. हा विषय सभागृहात मांडल्यानंतर चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा राऊत यांनी आपलं जात प्रमाणपत्र निवडणुकीआधी सबमीट केलं होतं. पण हे जात प्रमाणपत्र बरोबर नसल्याचा ठपका जात पडताळणी समितीकडून ठेवण्यात आला आहे. विशाखा राऊत यांनी याआधी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. पण वर्षभरापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी जात प्रमाणपत्र दाखवून निवडणूक कशी लढवली? असे काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
विशाखा राऊत यांच्याकडे तीन महिन्यांचा कालावधी
जिल्हाधिकारी कार्यालयातून विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता हे प्रकरण मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे येईल. यानंतर हे प्रकरण सभागृहात येईल. इथे या विषयावर महापौर रितू तावडे या निर्णय घेऊ शकतात. असं असलं तरी विशाखा राऊत यांच्याकडे अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. या काळात त्या कोर्टामध्ये अपील करु शकणार आहेत. तांत्रिक गोष्टी पाहून विशाखा राऊत या काय पाऊल उचलतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.
राऊत याचं पद रद्द झाल्यास प्रिया सरवणकर यांना मिळू शकते संधी
विशाखा राऊत या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. त्या मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहेत. तसेच आमदारदेखील राहिल्या आहेत. 1999 ते 2004 या काळात त्यांनी दादर विधानसभा या महत्त्वाच्या मतदारसंघाच्या आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. सध्या त्या ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत. माजी आमदार सदा सरणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं तर प्रिया सरवणकर यांना नगरसेवक पद मिळू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसं घडल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांच्या संख्येत एका नगरसेवकाने वाढ होईल.
विशाखा राऊत काय म्हणाल्या?
विशाखा राऊत यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. “मला तीन महिनांला कालावधी आहे. मी तीन महिन्यात मी अपील करु शकते. माझं पद आताच रद्द झालेलं नाही. अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे”, असं विशाखा राऊत म्हणाल्या. “माझ्या पंजोबाचे 1911 पासूनचे कागदपत्रे आहेत. माझी जात कुणबी आहे हे त्या कागदपत्रांमधून सिद्ध होतं. पण शिंदे गटाने जात पडताळणी समितीवर दाबव टाकला आणि अवैध ठरवण्यास सांगितलं आहे”, असा आरोप विशाखा राऊत यांनी केला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा