Sunil Tatkare Nephew joins Congress : अमोल महाडिक यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाच्या समन्वयक पदी करण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे कॅप्टन अमोल महाडिक यांनी जुलै महिन्याच्या अखेरीस काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अमोल महाडिक हे अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील दिवंगत केबिन क्रू अपर्णा महाडिक यांचे पती आहेत. अमोल महाडिक यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या समन्वयक पदी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेने ही नियुक्ती करण्यात आली.
तटकरेंचा भाचा काँग्रेसमध्ये
“आमच्या कुटुंबाची नेहमीच काँग्रेसच्या विचारसरणीवर निष्ठा राहिली आहे. माझे आजोबा, दत्ताजीराव ऊर्फ अण्णासाहेब तटकरे, हे काँग्रेसचे नेते होते. काँग्रेसमध्ये प्रवेश करणे म्हणजे जणू काही घरी परतल्यासारखे वाटते. केवळ राहुल गांधींचे नेतृत्वच देशाला योग्य दिशेने नेऊ शकते, यावर माझा विश्वास असल्याने मी या पक्षात सहभागी झालो आहे. पक्ष माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवेल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन.” अशा भावना अमोल महाडिक यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या होत्या.
Nashik Crime : नाशिकमधील 34 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, दोन वर्षांचे प्रेमसंबंध, रिसॉर्टवर 43 वर्षीय प्रियकराने जीव घेतला
अपर्णा महाडिकांचा विमान अपघात
अमोल महाडिकही एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होते. “विमान अपघाताच्या मानसिक धक्क्यातून बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न केले. सुरुवातीचे सहा महिने तर नेमके काय चालले आहे हे उमगतच नव्हते. उठून चालता येणेही कठीण वाटायचे. त्यानंतर होमिओपथी आणि माझ्या दहा वर्षांच्या मुलीसाठी समुपदेशनाचा आधार घेतला. आई-वडिलांनी आध्यात्मिक मार्ग अवलंबला. मीही आर्ट ऑफ लिविंगचा कोर्स केला आणि सावरण्यासाठी थोडी मदत झाली” अशा भावना अमोल महाडिक यांनी अपघाताच्या वर्षपूर्तीवेळी व्यक्त केल्या होत्या.
Dr Surdas on Ajit Pawar : श्रीमद्भगवद्गीता वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, ‘इस्कॉन’च्या डॉ सूरदास यांचा दावा, अजित पवारांनाही पुस्तक दिलेलं, त्यांनी वाचलं असावं
सावरण्यास वर्षभराचा कालावधी
जवळपास वर्षभर महाडिक बिनपगारी रजेवर होते. एअर इंडिया विमान अपघाताची बातमी आली, तेव्हा महाडिक दिल्लीमध्ये केबिन क्रू म्हणून प्रशिक्षण घेत होते. त्यांच्या प्रशिक्षणाचा पहिलाच दिवस होता. त्यानंतर ते पुन्हा प्रशिक्षणावर रुजू होऊ शकलेले नव्हते. विमानतळावर जाणे त्यांच्यासाठी सोपे राहिले नव्हते. जिथे जगभरात विविध विमानतळांवर कामानिमित्ताने जाणे व्हायचे, तिथे आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मुलीच्या मनात भीती आहे. आईला गमावल्यानंतर वडिलांनी पुन्हा विमानामध्ये काम करावे, अशी तिची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणाची वाट धरल्याचे दिसते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा