• Mon. Aug 17th, 2026

Nagpur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नागपूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. दारुची बॉटल दिसेनाशी झाल्यानं संतापलेल्या नवऱ्यानं बायकोसोबत संतापजनक कृत्य केलं आहे.

कामठी दारुमुळे पत्नीची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रनाळा-भिलगाव मार्गावरील खानवाणी लेआउट परिसरात दारू पिणं आणि जेवणावरून झालेला पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्यानं पतीनं पत्नीचे डोके जमिनीवर आपटल्याची संतापजनक घटना काल रविवारी रात्री घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्यामवती उमाशंकर वट्टी (वय 60) असं मृत महिलेचं नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती उमाशंकर थानसिंग वट्टी (वय 65) याला अटक केली आहे.

दारुची एक बॉटल कुठे गेली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाशंकर वट्टी आणि त्यांची पत्नी श्यामवती हे मूळचे (नगरवाडा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रनाळा शिवारातील खानवाणी लेआउट येथे झोपडी टाकून राहत होते. नेहमीप्रमाणे काल रविवारी दिवसभर बांधकामाच्या ठिकाणी काम केल्यानंतर दोघंही रात्री आपल्या घरी परतले. यावेळी श्यामवती स्वयंपाक करत होत्या. दरम्यान, उमाशंकरने देशी दारूच्या दोन बॉटल आणल्या होत्या. त्यापैकी एक बाटली दिसत नसल्याचं लक्षात आल्यानंतर, त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यानं उमाशंकरने पत्नी श्यामवती यांचे डोके जमिनीवर आपटले.

Maharashtra TimesMumbai Crime : तुला जायचं तर जा, मुलांना कुठेही न्यायचं नाही; मुंबईतील नौदल जवानाच्या कुटुंबाच्या मृत्यूमागे वैवाहिक वाद? दोन महिन्यांच्या बाळालाही संपवलं

10 वर्षांचा आपल्या डोळ्यांनी पाहिलं

या घटनेवेळी त्यांचा 10 वर्षांचा नातूही तेथे उपस्थित होता. पती-पत्नीमध्ये सुरू असलेला वाद पाहून त्याने आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यानंतर त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील श्यामवती यांना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषितकेलं. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी उमाशंकर वट्टी याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमका मृत्यू कशामुळे?

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार दारूच्या बाटलीवरून झालेल्या वादातून आरोपीनं पत्नीचं डोकं जमिनीवर आपटल्यानं तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहे.

Maharashtra TimesRatnagiri News: ऐन गणेश चतुर्थीला चाकरमान्यांचे हाल! मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे; आता सरकार, प्रशासनाला जाग, कधीपर्यंत काम होणार?

पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

दिवसभराचे कर्तव्य बजावल्यानंतर घरी परतले, कुटुंबीयांसोबत जेवण केले आणि त्यानंतर काही वेळातच नागपूर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. पोलीस लाईन टाकळी येथील शासकीय पोलीस क्वार्टरमध्ये घडलेल्या या घटनेने पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर अंकुशराव झोल असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते नागपूर पोलीस आयुक्तालयातील अर्ज शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा