• Fri. Aug 14th, 2026

Nanded Police Inspector Santosh Kendre : या घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच नाव चर्चेत आलं आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता केंद्रे यांनी तत्काळ हल्लेखोराला रोखलं. या झटापटीत बोटाला घाव लागल्यानं ते किरकोळ जखमी झाले. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या धैर्य आणि तत्परतेमुळे मोठी घटना टळली.

पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
​अर्जुन राठोड, नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी आले असता त्यांच्यावर एका 62 वर्षीय वृद्धाने प्राणघातक हल्ला केला. काल गुरुवारी दुपारी मुदखेड तालुक्यातील मुगट येथील मातासाहिब गुरुद्वारा येथे ही थरारक घटना घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली. तर अन्य एक पोलीस अधिकारी झटापटीत जखमी झाला.

या घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच नाव चर्चेत आलं आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता केंद्रे यांनी तत्काळ हल्लेखोराला रोखलं. या झटापटीत बोटाला घाव लागल्यानं ते किरकोळ जखमी झाले. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या धैर्य आणि तत्परतेमुळे मोठी घटना टळली. पोलीस अधिकाऱ्याच्या या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, खासदार हरसीमरत कौर बादल यांनी हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय आभार मानत बक्षीस देण्याचं सांगितलं, पण संतोष केंद्रे यांनी ‘माझं कर्तव्य आहे’, असं म्हणत बक्षीस नाकारलं आणि मनाचा मोठेपणा दाखवला.

Maharashtra TimesFDA Action : गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, नागपूर आणि सोलापुरात एफडीएची धाड, डॉक्टरसह आरोपींवर कारवाई

कोण आहेत संतोष केंद्रे?

विशेष सुरक्षा दलात पोलीस निरीक्षक पदावर असलेले संतोष केंद्रे यांचा अतिशय खडसर आणि संघर्षमय प्रवास राहिला आहे. मूळ लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील ‘कुणकी’ गावातील रहिवासीआहेत. 2001 मध्ये हिंगोली येथे पोलीस कर्मचारी (कॉन्स्टेबल) म्हणून संतोष केंद्रे हे भरती झाले. त्यानंतर 2006 मध्ये MPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 2009 मध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली. त्यानंतर 2009-2010 मध्ये नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत त्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संतोष केंद्रे पहिली पोस्टिंग 2010 मध्ये PSI म्हणून नागपूर शहर पोलीस दलात झाली. त्यानंतर दहशतवादविरोधी कारवायांसाठी अत्यंत उच्च प्रशिक्षित समजल्या जाणाऱ्या ‘फोर्स वन’ या महाराष्ट्राच्या विशेष दलात ते मुंबईत रुजू झाले. 2023 मध्ये केंद्रे यांना पदोन्नती मिळाली. त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य निभावले. त्यानंतर नांदेडमध्ये बदली झाल्यांतर ते विशेष सुरक्षा दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

नेमकी काय घडलं होतं?

माजी उपमुख्यमंत्री असलेले सुखबीरसिंग बादल हे पंजाब राज्यातील एक मात्तब्बर नेते म्हणून ओळखले जातात. शिरोमणी अकाली दलाचे ते प्रमुख आहेत. त्यांची पत्नी हरसीमरत कौर बादल खासदार आहेत. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी बुधवार सुखबीरसिंघ बादल हे आपल्या कुटुंबियांसह नांदेड दौऱ्यावर आले होते. सचखंड गुरुद्वारामध्ये बादल कुटुंबियाकडून अखंड पाठाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Maharashtra TimesNagpur News : ‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप नेते अन् कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाणांकडून थेट कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?
काल गुरुवारी दुपारी शहरापासून 15 किलोमीटर दूर असलेल्या मातासाहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी ते गेले होते. दर्शन करून परत येताना जसपालसिंघ नामक निहंगसिंगने खंजरने त्यांच्यावर हल्ला केला. झेड प्लस सुरक्षा असताना देखील हल्लेखोरांना सुरक्षा भेदत त्याने हल्ला केला. या घटनेनंतर गोधळ आणि धावपळ उडाली. ​मात्र, तिथे सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी हल्लेखोराला रोखलं आणि हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेण्यात यश मिळवलं. या प्रकरणी मुदखेड पोलिसांनी आरोपी जसपालसिंघ याला ताब्यात घेतलं आहे. सत्तेत असताना काम योग्य न केल्यामुळे तसेच नशेच्या प्रकारला न रोखल्यामुळे हल्ला केल्याचा प्राथमिक जवाब हल्लेखोरानं पोलिसांना दिल्याची माहिती आहे. या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयानं 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा