Nashik News: स्वातंत्र्यदिन अवघ्या एक दिवसावर आलेला असताना देशात सर्वत्र अलर्ट यंत्रणा सज्ज आहे.याच यंत्रणेच्या माध्यमातून आसामहून नाशिकमार्गे पुण्यात जाणाऱ्या बांग्लादेशी दापत्याला अटक करण्यात आली.
संशयित दाम्पत्य, दाम्पत्यासह त्यांना आश्रय देणाऱ्यांवर गुन्हा दाखल
गुन्हे शाखा युनिट दोनचे अंमलदार संतोष तुकाराम सुपेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद साकीब मुल्ला (वय २२, रा. खुलना, जि. नराईल, राज्य खुलना, बांगलादेश) आणि त्याची पत्नी नाहिदा बादशाह मुल्ला (वय २१, रा. सगोलसिरा, जि. नराईल, बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित दाम्पत्याची नावे आहेत. या दाम्पत्यासह त्यांना आश्रय देणाऱ्या संशयित पायल शिंदे (रा. बालाजीनगर, पुणे ) अशा तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६(३), २४९, ३(५), पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३, ६ आणि परकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भारत-बांगलादेश सीमेवरून आसाममध्ये घुसखोरी
दाम्पत्याला नाशिकरोड न्यायालायने पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा बांगलादेशात विवाह झाला होता. त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरून आसाममध्ये घुसखोरी केली होती. दोन दिवसांपूर्वी ते आसामवरून रेल्वेने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथून पुढे बसने पुण्याच्या दिशेने जाऊन तिथे स्थायिक होण्याचा आणि मोलमजुरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे समोर आले आहे.
Mumbai Landslide: डोंगराखाली मृत्यूची छाया; गेल्या 35 वर्षांत मुंबईत दरड कोसळून 340 जणांचा करुण अंत, तीनशे जखमी
संशयितांकडे ३५ हजारांचा मोबाइल आणि बांगलादेशी सिम कार्ड्स
तपासादरम्यान संशयितांकडून ३५ हजारांचा मोबाइल बांगलादेशी सिम कार्ड्स, बांगलादेशी बनावटीचे फेमिकॉन पाकीट, ‘आस्मा बादशाह मुल्ला’ व ‘Md Shakib Seakh’ यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड, स्क्रीनशॉटच्या प्रिंट्स, बांगलादेशी जन्मदाखल्याच्या व नॅशनल आयडी कार्डच्या छायांकित प्रती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित पायल शिंदे हिने नाहिदा ही बांगलादेशी नागरिक असल्याचे माहीत असतानाही तिला सुमारे ६ महिने आश्रय देऊन तिच्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड तयार करून दिले. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, प्रदीप गिरी यांच्या पथकाने केली.
