• Thu. Aug 13th, 2026

    Nashik Crime : केमिकलमध्ये नोट टाकली, नंतर चपातीसारखी लाटली, नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

    नाशिकमध्ये पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई केली आहे. पोलिसांनी बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी 10 लाखांच्या मोबदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याचा सौदा केला होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या कारखान्यावर धाड टाकत तो कारखाना उद्ध्वस्त केला आहे. एका बंगल्यामध्ये हा सगळा प्रकार सुरु होता. विशेष म्हणजे नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा भरवण्यात येणार आहे. या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रकार सुरु होता का?या कुंभमेळ्यात बनावट नोटा बाजारात घुसवण्याचा प्रयत्न होता का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जात आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी सिनेस्टाईल कारवाई केली आहे.

    नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर रोड येथे ही कारवाई करण्यात आली आहे. बनावट नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांकडून 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

    नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाकडून नाशिक त्रंबकेश्वर रोडवर संयुक्तिक कारवाई करण्यात आली. यावेळी बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

    तळेगावमधील बंगल्यात सुरु होता प्रकार

    या कारवाईत नोटा छापण्याचं साहित्य आणि सामग्री जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव गावात एका बंगल्यात हा नोटा छापण्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

    विचित्र क्लृप्ती वापरुन बनावट नोटा तयार केल्या जायच्या

    या कारखान्यात संशयितांकडून चलनी नोटा एका विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून त्या नोटांची शाई कागदावर वटवून बनावट नोटा ह्या तयार केल्या जात होत्या. तर दहा लाख रुपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यात तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा देताना पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

    ‘या’ आरोपींना अटक

    अमरेश्वर आईथा (तेलंगणाचा रहिवासी), दासरी सत्यइ (तेलंगणाचा रहिवासी), गोकुळ दाते (तळेगाव नाशिकचा रहिवासी), हिरामण दाते (तळेगाव नाशिकचा रहिवासी), मच्छिंद्र घनदाट (सातपूर नाशिकचा रहिवासी) या पाच संशयित आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली अटक केले आहे.

    Nashik News

    पोलिसांकडून सखोल तपास सुरु

    या रॅकेट मागे आणखी काही मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणी आणखी काय बाबी समोर येतात? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.