• Wed. Aug 12th, 2026

    Air India Pilot Dope Test : सूत्रांच्या माहितीनुसार, फुकेत-दिल्ली एअर इंडिया विमानाच्या पायलटच्या चाचणीत गांजा (मारिजुआना) या सायकोॲक्टिव्ह अमली पदार्थाचा वापर झाल्याचे आढळले आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गेल्या आठवड्यात टर्ब्युलन्समुळे प्रवासी आणि केबिन क्रू जखमी झालेल्या फुकेत-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाच्या कॅप्टनची अमली पदार्थाच्या सेवनासंदर्भातील पडताळणी चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मंगळवारी सूत्रांकडून मिळाली. मात्र, तपासादरम्यान संकलित करण्यात आलेल्या काही नोंदी, निवेदने, वैद्यकीय माहिती आणि इतर सामग्री ही लागू असलेल्या तपास कार्यपद्धतीनुसार संरक्षित आणि गोपनीय आहे.

    अमली पदार्थाची अधिकृत माहिती नाही

    वस्तुस्थितीचा निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक निष्कर्ष काढण्यासाठी तपास प्रक्रियेची सचोटी आणि गोपनीयता राखणे, अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विमान अपघात तपास ब्युरोतर्फे (एएआयबी) अपूर्ण, पडताळणी न केलेल्या किंवा निवडक स्वरूपात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे कोणतेही निष्कर्ष न काढण्याचे, आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे अमली पदार्थ सेवनाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मंगळवारी उपलब्ध झाली नसल्याचे समोर आले.

    गांजाचा वापर झाल्याची सूत्रांची माहिती

    सूत्रांच्या माहितीनुसार, वैमानिकाच्या चाचणीत गांजा (मारिजुआना) या सायकोॲक्टिव्ह अमली पदार्थाचा वापर झाल्याचे आढळले आहे. ४ ऑगस्ट रोजी फुकेत-दिल्ली मार्गावरील एआय २३७९ या एअरबस ए ३२० विमानाला हवेत अचानक जोरदार धक्के बसल्याने विमानाची उंची ३०० फूटांनी कमी झाली होती. या घटनेत किमान २० प्रवासी आणि चार कर्मचारी जखमी झाले होते.

    या घटनेनंतर विमानातील दोन्ही वैमानिकांची नियमानुसार सायकोॲक्टिव्ह पदार्थ सेवनाची तपासणी करण्यात आली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ९ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, ‘कॅप्टनच्या (पायलट-इन-कमांड) स्क्रीनिंग चाचणीचा निकाल पुष्टीकरण चाचणीची गरज दर्शवणारा होता. त्यामुळे नमुने पुष्टीकरणात्मक विश्लेषणासाठी नियुक्त प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.’

    Maharashtra TimesBaramati Crime : अथर्व गोळी देऊन माझ्याशी संबंध ठेवणारे, आईला फोन, काही तासात मुलीचा गूढ मृत्यू, बारामतीत खळबळएएआयबी सध्या संबंधित सर्व तांत्रिक, संचालनविषयक, वैद्यकीय आणि मानवी घटकांशी संबंधित पुराव्यांचे पद्धतशीर संकलन, जतन आणि परीक्षण करत आहे. यामध्ये विमान आणि त्याच्या प्रणाली, नोंदवलेला उड्डाण डेटा, संबंधित कार्यान्वयन व देखभालविषयक नोंदी, वैद्यकीय माहिती आणि संबंधित व्यक्तींच्या मुलाखतींचे परीक्षण यांचा समावेश आहे.

    संबंधित घटनेबाबत सुरू असलेल्या तपासादरम्यान ही घडामोड समोर आली आहे. ‘डिरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन’ने (डीजीसीए) या प्रकरणातील तपासाचा निकाल लागेपर्यंत संबंधित विमान कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरून (रोस्टरमधून) बाजूला ठेवले होते.

    तरीही, केवळ अंमली पदार्थांच्या प्राथमिक चाचणीत आलेला ‘नॉन-निगेटिव्ह’ (संशयास्पद) निष्कर्ष पाहून कोणताही अनुमान काढू नये, असा इशारा विमान वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधींनी दिला आहे.

    वैमानिक संघटनांचं म्हणणं काय?

    ‘एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष कॅप्टन सॅम थॉमस यांनी सांगितले की, उड्डाणानंतर केल्या जाणाऱ्या अमली पदार्थ चाचणीच्या (ड्रग स्क्रीनिंग) निकालांवर सामान्यतः वापरली जाणारी औषधे आणि आहारातील पूरक घटकांचा (डायटरी सप्लिमेंट्स) परिणाम होऊ शकतो, याबद्दल या संघटनेने आपल्या सदस्यांना वारंवार जागरूक केले आहे.

    ‘फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स’चे अध्यक्ष कॅप्टन सी. एस. रंधावा यांनी सांगितले की, विमान कंपनीने डोपिंग चाचणीचे निकाल अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत; त्यामुळे, संबंधित वैमानिकाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांवर अधिकृत दुजोरा मिळेपर्यंत ते कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत.

    “सध्या विमान कंपनीकडून डोपिंग चाचणीचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे आम्ही अधिकृत दुजोऱ्याची वाट पाहू. ती चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली आहे, यावर मी भाष्य करणार नाही,” असे ते म्हणाले.

    Maharashtra TimesAdvait Upadhyay : चार महिन्यांवर लग्न, होणाऱ्या पत्नीला सेल्फी पाठवून बेपत्ता, ड्रोनमध्ये टेकडीजवळ ‘बॉडी’ दिसली, 31 वर्षीय अद्वैतचे बरेवाईट झाल्याची भीती

    पायलटवर कारवाईची शक्यता

    रंधावा यांनी नमूद केले की, जर चाचणीचा निकाल ‘पॉझिटिव्ह’ आला, तर दंडात्मक कारवाई आणि वैमानिकाच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या इतर परिणामांव्यतिरिक्त, त्याचे परवाना रद्द होणे ही देखील एक संभाव्य कारवाई असू शकते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा