Ajanta News: सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी अगदी लेणीच्या टी पॉइंटला परिसरात बाभळी फुलली आहे. आणि अजिंठ्याला एक वेगळाच साज चढला आहे.
बाभळीच्या वर्गातील दुर्मीळ असलेली सपुष्प वनस्पती दुरंगी बाभळी
सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी वनभ्यासकरताना राखीव वनक्षेत्राच्या शेजारी असलेल्या दुरंगी बाभळी फुललेली आढळली. तिचा अर्धा भाग पिवळा म्हणजे भंडाऱ्यासारखा; तर अर्धा भाग गुलाबी आहे. या फुलांकडे बघितल्यानंतर निसर्गाने भंडारा व गुलालाची एकाच वेळी उधळला आहे, असे भासते. ही बाभळीच्या वर्गातील दुर्मीळ असलेली सपुष्प वनस्पती दुरंगी बाभळी, जीला वीरतरु, वेलतुरा येलतुरा म्हणूनही ओळखले जाते.
ऐतिहासिक वारसा यांचे नाते विषद करतो.
दुरंगी बाभळी शुष्क कोरड्या व डोंगराळ जमिनीत येणारी झुडूपवर्गीय वनस्पती आहे. त्यामुळे शमी ऐवजी दुरंगी बाभळीचा नैसर्गिक प्रसार होत नाही. अजिंठा लेणीतील चित्र शैलीत विविध स्थानिक वनस्पतींच्याफुलांचे रंगवापरलेले असल्याने निसर्गाचा हा भंडारा व गुलाल येथील जैवविविधता व ऐतिहासिक वारसा यांचे नाते विषद करतो.
बाभळीच्या काठीस विशेष महत्त्व आहे.
या सुंदर, लांब, मंद सुगंध असलेल्या फुलांवरती विविध प्रजातीच्या मधमाशा व फुलपाखरे परागकण शोषण्यास नेहमीच गर्दी करतात. या फांद्यांवर थोड्या-थोड्या अंतराने जेथे काटे असतात, त्या जागी घट्ट गाठी असतात. त्या गाठी व वृक्षाचा मूळ चिवटपणा यामुळे या बाभळीच्या काठीस विशेष महत्त्व आहे. यास वेलतुऱ्याची काठी म्हटले जाते.
Baramati Crime : अथर्व गोळी देऊन माझ्याशी संबंध ठेवणारे, आईला फोन, काही तासात मुलीचा गूढ मृत्यू, बारामतीत खळबळ
बीट पुस्तिकात नोंद
‘या दुर्मीळ वनस्पतीची अधिकृत नोंद अजिंठा प्रादेशिक वनविभागाच्या बीट पुस्तिकात घेण्यात आली आहे. यातून या डोंगरातील जैवविविधतेची श्रीमंती जगापुढे येते. बीज संकलन करून आम्ही रोप निर्मिती करणार आहोत,’ डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले.
Chhatrapati Sambhajinagar News: सिटी चौक पोलिस ठाण्याची जुनी इमारत होणार इतिहासजमा; सिटी चौक ठाण्याचा कायापालट निश्चित
फुले नसताना हुबेहूब शमी
अजिंठ्याला निसर्गाची उधळण करणार दुर्मीळ दुरंगी बाभळीच फुल अर्धी गुलाबी , किंवा जांभळी , अर्धी पिवळी अशा दोन रंगछटांमध्ये असतात. फुले नसताना हुबेहूब शमी सारख दिसणार हे बाभळीच झाड जून ते ऑगस्ट दरम्यान फुल देते . सध्या पावसाचे दिवस चालू असल्यामुळे
अजिंठ्याला निसर्गाची उधळण झाली.
