• Mon. Aug 10th, 2026

    जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 10, 2026

    मुंबई, दि. १० : जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. या पुरस्कारांतर्गत २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे.

    जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथून प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कारांसाठीचे विहित नमुन्यातील अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे बंद लिफाफ्यात सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर (दूरध्वनी क्रमांक- ८८८८८९१६३२) येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

    0000

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed