• Sun. Aug 2nd, 2026

    तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, खरंच सुचत नाहीये, अमित ठाकरे अर्ध्या भाषणातून उतरले, परत येताच जोशाने बोलले

    तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, खरंच सुचत नाहीये, अमित ठाकरे अर्ध्या भाषणातून उतरले, परत येताच जोशाने बोलले

    Maharashtra Politics : “मी तुमच्या उत्साहामुळे विसरायला लागलो. मला खरंच सुचत नाही, मी परत येतो थांबा” असं म्हणून अमित ठाकरे मंचावरुन खाली उतरले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    तमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. भाषण करताना अमित ठाकरे काही काळ अडखळले, तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, असं म्हणत ते मंचावरुन उतरुन खाली गेले आणि पाच मिनिटांनी पुन्हा व्यासपीठावर येऊन भाषण करु लागले.

    अमित ठाकरे काय म्हणाले?

    सुरुवातीला भाषणाला उभं राहताना अमित ठाकरे म्हणाले, “थोड्या घोषणा द्या म्हणजे मला भाषण आठवेल. ज्या विद्यार्थी, तरुणांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करुन, केंद्रातून राजीनामा आणला, त्यांचं आणि पालकांचं अभिनंदन. मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो. ते माझे वडील आहेत म्हणून बोलत नाही, तर प्रामाणिक माणूस आहे म्हणून सांगतो. तुमच्यासारखे सहकारी नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. आपण आतापर्यंतची आंदोलनं विसरलो पाहिजे, पुढे जायला पाहिजे” असं सांगतानाच “मी तुमच्या उत्साहामुळे विसरायला लागलो आहे. मला खरंच सुचत नाहीये, मी परत येतो थांबा” म्हणून अमित ठाकरे मंचावरुन खाली उतरले.

    Dhananjay Munde Beed Speech | मंत्रि‍पदावरून धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

    Maharashtra TimesAtul Chavan : पत्नी भाजप आमदार, PWD तील मुख्य अभियंते अतुल चव्हाणांचा तडकाफडकी राजीनामा, व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा

    अमित ठाकरे पुन्हा मंचावर

    “मी खरंच काही पाठ करुन आलो नाही. तुमच्या ताकदीने धडकी भरली. आधीचं आठवतंय ना की परत बोलू? आपण विद्यार्थ्यांना व्हॅनमधून बाहेर काढत होतो. हा कॉन्फिडन्स माझ्यात कुठून आला? तर तुमची ताकद आणि राज ठाकरे नावाची शक्ती माझ्या मागे आहे. त्यावेळी पोलीस शांत होते. घाबरले होते का? तर नाही! महाराष्ट्र पोलीस आहेत ते. त्यांना आदरयुक्त दरारा होता. त्यांना माहिती की त्यांच्यासाठी कोणी उभं राहत असेल तर राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक. आपली ताकद समजून घेतली पाहिजे.” असं अमित ठाकरे म्हणाले.

    Maharashtra TimesTanmay Wange : पुण्यातील MBBS चा विद्यार्थी 14 दिवसांपासून बेपत्ता, आई रुग्णालयात, हॉस्टेलवर रॅगिंग झाल्याचा आरोप

    चंद्रकांत पाटलांवर टीका

    “मी राजकारणी नाही, मला बोलता येत नाही. आपल्या राज्यात, देशात काय चालू आहे हे मला माहिती आहे. गेल्या एक वर्षात भीषण परिस्थिती पाहिली. खिळे लावून काठ्या घालतात, मुलींवर हात टाकतात, कपडे फाडतात. ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले… दिल्ली पोलिसांनी दगड उचललेत, त्यावरील फिंगर प्रिंट आधारशी लिंक करणार. या मुलांनी केंद्रातून राजीनामा आणला, राज्यातून आणायला वेळ नाही लागणार. मला मारा-मला मारा म्हणणारा तो मुलगा नागपूरचा आहे. फडणवीसांच्या शहरातला. पण मुख्यमंत्र्यांना त्याच्यावर बोलावंसं वाटलं नाही” असंही अमित ठाकरे म्हणाले.