• Tue. Jul 21st, 2026

    Crime News: रॅपिडोवरून रिक्षा बुक झाली, प्रवाशाला घ्यायला जाताच चालकाला धक्कादायक अनुभव, वेगळाच सापळा उघड!

    Crime News: रॅपिडोवरून रिक्षा बुक झाली, प्रवाशाला घ्यायला जाताच चालकाला धक्कादायक अनुभव, वेगळाच सापळा उघड!

    Mira Bhayandar Crime: घटनास्थळावरून आरोपी पसार झाल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत यादव याने काशिगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

    रॅपिडोवरून रिक्षा बुक झाली, प्रवाशाला घ्यायला जाताच चालकाला धक्कादायक अनुभव, वेगळाच सापळा उघड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    भाविक पाटील, मिरा-भाईंदर: ऑनलाइन रिक्षा बुकिंग सेवा चालकांसाठी किती धोकादायक ठरू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय मिरा-भाईंदरमध्ये आला आहे. रॅपिडो अॅपवरून प्राप्त झालेले भाडे स्वीकारून प्रवाशाला घेण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाला चौघा अज्ञातांनी बेदम मारहाण करून आणि चाकूचा धाक दाखवत लुटले आहे. या घटनेप्रकरणी काशिगाव पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    ठाण्यातील वर्तकनगर येथे राहणारे २४ वर्षीय सचिन यादव हा रिक्षाचालक असून तो रॅपिडो या प्रवासी ॲपद्वारेही सेवा देतो. शनिवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांला घोडबंदर येथील वेलकर पेट्रोल पंप परिसरातून रिक्षा बुक झाल्याची ऑनलाइन सूचना मिळाली होती. नियमित भाडे असल्याचे समजून ते काही मिनिटांतच दिलेल्या ठिकाणी पोहोचले.

    तेथे रिक्षा बुक करणाऱ्या तरुणासह आणखी तीन जण उभे होते. त्यांनी आपणच रिक्षा बुक केल्याचे सांगत यादव यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्यांना घेरत त्यांचा मोबाईल प्रथम हिसकावून घेतला. त्यानंतर चौघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. मारहाणी दरम्यान यादव यांच्या खिशातील ७०० रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. मात्र, आरोपींची दहशत यावरच थांबली नाही. त्यांनी यादव यांच्या गळ्यावर धारदार चाकू ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मोबाईल अनलॉक करण्यास भाग पाडत ऑनलाइन व्यवहाराद्वारे आणखी २ हजार रुपये स्वतःच्या खात्यात हस्तांतरित करून घेतले. त्यानंतर चालक घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्थानकात पोहोचला.

    याची तक्रार मिळताच काशिगाव पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत, तपासाची चक्रे फिरवून विविध तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे रविवारी चौघांना ताब्यात घेतले. यातील तिघे अल्पवयीन असल्याची माहिती तपास अधिकारी अन्वर शेख यांनी दिली. प्राथमिक तपासात ही टोळी रॅपिडोसह अन्य ऑनलाइन प्रवासी सेवांवरील चालकांना लक्ष्य करत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, अशाच पद्धतीने आणखी काही लुटी केल्या आहेत का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा