• Tue. Jul 21st, 2026
    केतन तुझ्यासाठी हिरो नंबर वन का? अँकरचा प्रश्न, सियाची बेमालूम थाप, दोन खोट्या प्रशंसा

    Siya Goyal Ketan Agarwal Engagement Video : ‘होणारा नवरा म्हणून यांच्या स्वभावातील कुठली गोष्ट तुम्हाला​​ सर्वाधिक भावते, ज्यावरुन तुम्हाला वाटतं की हा माझा हिरो नंबर वन आहे’ असा प्रश्न साखरपुड्यात अँकरने सिया आणि केतनला विचारला होता

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. फेब्रुवारीत झालेल्या दोघांच्या साखरपुडा समारंभातील या व्हिडिओत दोघांना एकमेकांबद्दल विचारण्यात आलं होतं. या क्लिपमध्ये सिया केतनच्या दयाळू आणि काळजी घेणाऱ्या स्वभावाचे कौतुक करताना पाहायला मिळते.

    दयाळू आणि केअरिंग

    अँकर विचारते की, ‘होणारा नवरा म्हणून यांच्या स्वभावातील कुठली गोष्ट तुम्हाला सर्वाधिक भावते, ज्यावरुन तुम्हाला वाटतं की हा माझा हिरो नंबर वन आहे’; त्यावर ‘तो खूप दयाळू आणि केअरिंग आहे’ असं सिया हसत आणि काहीसं लाजत बोलते. यावेळी दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांमधून टाळ्या येतात.

    लोहगड किल्ल्यावरुन खोल दरीत ढकलून नियोजित वर केतन अग्रवाल याची हत्या केल्याच्या आरोपाखाली सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीअंतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवल्यानंतर काही दिवसांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणातील एकामागून एक घडामोडी समोर येत आहेत.

    सिया-चेतनने गुप्त विवाह केल्याचा दावा

    सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी राजस्थानमधील खाटू श्याम मंदिरात गुप्त विवाह केल्याचा दावा केला जात होता. याची खातरजमा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने त्या मंदिराला भेट दिल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणतेही सीसीटीव्ही फुटेज आढळले नाही.
    Maharashtra TimesAtul Pawar : अतुल साप चावल्याने गेला! स्कूल संचालकाच्या बायकोचे स्कूल बसचालकाशी संबंध, पतीचा काटा काढला, पण पवार कुटुंबाने छडा लावलाच

    केतनच्या आईचे पंतप्रधानांना पत्र

    दरम्यान, केतनची आई राखी अग्रवाल यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक भावूक पत्र लिहून आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवून देण्याची आणि स्वतः यात लक्ष घालण्याची विनंती केली. या घटनेमुळे कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाचे वर्णन करताना राखी अग्रवाल यांनी म्हटले की, मुलाच्या निर्घृण हत्येनंतर त्यांचे संपूर्ण जगच बुडाले आहे.

    मी अस्वस्थ, बीडमध्ये काहीही झाल्यास माझं नाव घेतलं जातं; धनंजय मुंडेंची खंत

    “माझ्या मुलाची निर्घृण हत्या झाली आणि त्याच्यासोबतच माझे संपूर्ण जगही संपले. आमच्या घरातील प्रत्येक कोपरा मला त्याची आठवण करुन देतो. त्याची खोली, त्याचे कपडे, त्याचे फोटो आणि त्याच्या हसण्याची जागा आता शांततेने घेतली आहे. त्या सर्व गोष्टी मला दररोज याची जाणीव करुन देतात, की तो आता कधीच परत येणार नाही” असे त्या पत्रात म्हटले आहे.
    Maharashtra TimesNagpur Crime : पुण्यातील नर्सिंग विद्यार्थिनीला इन्स्टावर मित्र मिळाला, 21 वर्षीय तरुणाने नागपुरात बोलावलं, भेटीत भलताच प्रकार

    नातवाची हत्या, आजोबांचा धक्क्याने मृत्यू

    या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबावर ओढवलेल्या दुहेरी संकटाचाही त्या शोकाकुल माऊलीने उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, केतनच्या हत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या आजोबांचेही अवघ्या तीन आठवड्यांच्या आत निधन झाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा