• Mon. Jul 20th, 2026

    Accident News: आजीच्या अंत्ययात्रेला निघाला अन् नियतीने वाटेतच थांबवले; नातवालाही श्रद्धांजली वाहण्याची कुटुंबावर दुर्दैवी वेळ

    Accident News: आजीच्या अंत्ययात्रेला निघाला अन् नियतीने वाटेतच थांबवले; नातवालाही श्रद्धांजली वाहण्याची कुटुंबावर दुर्दैवी वेळ

    अमुलकुमार जैन, रायगड: आजीचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी रात्रीच्या अंधारात दुचाकीवरून विजापूरच्या दिशेने निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचं अपघाती निधन झालं आहे. रामा बाळू माशाळ (वय ३०, मूळ रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) असं मृत तरुणाचं नाव असून अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे एका अंत्ययात्रेला निघालेल्या तरुणाचीच अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबीयांवर ओढावली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रामा माशाळ हा लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथून रविवारी पहाटेपूर्वी दुचाकीवरून विजापूरकडे निघाला होता. त्याच्या आजीचे निधन झाल्याने अंत्ययात्रेला वेळेत पोहोचण्यासाठी त्याने एकट्याने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. दख्खन गावच्या बसथांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील आंबा घाटातील वळणावर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की रामा याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

    पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या रामाला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

    देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून पोलीस विविध तांत्रिक माध्यमांच्या साहाय्याने वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

    दरम्यान, या दुर्घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे रामाच्या नातेवाईकांनी त्याला रात्रीच्या वेळी दुचाकीने एकट्याने जाऊ नकोस, आपण सर्वजण चारचाकी वाहनाने एकत्र जाऊ, असा वारंवार आग्रह केला होता. मात्र रामाने तो आग्रह नाकारत एकट्याने प्रवास सुरू केला. “त्याने आमचे ऐकले असते, तर आज माझा भाचा आमच्यात असता,” अशी अश्रूंनी भरलेली प्रतिक्रिया त्याचे मामा बाळू तांबे यांनी व्यक्त केली.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed