• Fri. Jul 17th, 2026
    Sonam Wangchuk : सुप्रिया सुळे दिल्लीत सोनम वांगचुक यांच्या भेटीला, केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत मुद्दा मांडणार

    खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आपण याबाबतचा मुद्दा मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत जंतरमंतर मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिली. सोनम वांगचुक यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे या जंतरमंतर मैदानावर गेल्या. तिथे त्यांनी सोनम वांगचुक यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तरुणांना संबोधित केलं. सोनम वांगचुक यांची विचारपूस केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सोनव वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा आपण हिवाळी अधिवेशनात मांडू. तसेच हिवाळी अधिवेशनाआधी आणखी दोन ठिकाणी मांडू, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

    “राज्यात आंदोलन चाललं असेल तर ती आमची नैतिक जबाबदारी आहे की, समाजात ज्या गोष्टी सुरु आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत. समाजातील पालकांमध्ये, तरुण पिढीत एक भावना आहे, इथे आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत, आमची नैतिक जबाबदारी असते की, समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या संसदेत मांडल्याच पाहिजेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    हिवाळी अधिवेशनाआधी दोन ठिकाणी विषय मांडणार

    “संसद सुरु होण्याआधी दोन ठिकाणी मी या विषयावर बोलणार आहे. एकतर रविवारी सकाळी सर्वपक्षीय बैठकीत बोलणार आहे. केंद्र सरकारने ही रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस, त्याचबरोबर शिक्षणात झालेला सावळा गोंधळ, राम मंदिरचे जे व्हिडीओज येत आहेत, असे अनेक गंभीर विषय देशासमोर आहेत. सर्वपक्षीय बैठकीत हे सर्व विषय आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत बोलून मांडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

    “सोमवारी सकाळी 10 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मी इथल्या भावना आणि इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता याबाबत बोलणार आहे”, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

    एनडीएममध्ये सहभागी होणार?

    सुप्रिया सुळे यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी “याबाबत मला तरी कल्पना नाही. ना एनडीएने मला फोन केला आणि ना मी एनडीएला फोन केला”, अशी प्रतिक्रिा दिली.

    “हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमचे मायबाप महाराष्ट्राची आणि देशाची जनता आहे. त्यांची कामे करण्यासाठी आम्ही निवडून येतो. त्यामुळे अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं. त्यामुळे आम्ही जातो. आम्ही फोटो काढतो. आम्ही ट्विट करतो. आम्ही ट्विट केले नसते तर तुम्हाला कळले असते का आमची भेट झाली?”, असा सवाल त्यांनी केला.

    “मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटले. यात काय गैर आहे? एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वन नेशन, वन इलेक्शनच्या कामासाठी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलो. जॉईन पार्लमेंटरी सर्वच पक्षांचे लोकं होते. आम्ही जावून भेटलो. सशक्त लोकशाही आहे. मला सांगा मंत्री काय गुन्हेगार आहेत का की आम्ही त्यांना भेटू शकत नाहीत?”, असा देखील सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा