• Fri. Jul 17th, 2026

    Shivsena News: विनायक राऊत प्रकरणात मोठा ट्विस्ट; शिंदेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुखालाही नोटीस, काय आहे फिरोज बाबा कनेक्शन?

    Shivsena News: विनायक राऊत प्रकरणात मोठा ट्विस्ट; शिंदेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुखालाही नोटीस, काय आहे फिरोज बाबा कनेक्शन?

    सिंधुदुर्ग: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांविरोधात त्यांच्या सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूबाबाच्या मदतीने अघोरी कृत्य करण्यात आल्याचाही आरोप गिरीजा यांनी केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून ताब्यात घेत फिरोजबाबा याला अटक करण्यात आली. या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांची कोंडी केली जात असतानाच नवा ट्विस्ट आला आहे. कारण याच प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनाही कापूरबावडी पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसंच आणखी तीन ते चार जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे, अशी माहिती ठाणे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी दिली आहे. या नोटिशीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनीही संजू परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

    वैभव नाईक यांनी म्हटलं आहे की, “अटक करण्यात आलेला फिरोज बाबा हा सावंतवाडीतील कोरेगावचा आहे. तो गितेश राऊतच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे. यावरून काही लोकप्रतिनिधी विनायक राऊत यांच्यावर आरोप करत होते. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे काही लोक अनेकवेळा गेले होते. त्यांचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत. आता त्याचाच एक भाग म्हणून त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, हा आमचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे. खरातबाबाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोणत्या आमदाराच्या जवळ होते हे सगळ्यांना माहिती आहे,” असा टोलाही वैभव नाईक यांनी लगावला आहे. तसंच सिंधुदुर्ग जिल्हा हा देव-देवतांचा जिल्हा आहे. अनेक आध्यात्मिक गुरु या जिल्ह्यात होऊन गेले आहेत. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी काही लोक कोणतं तंत्र या बाबांकडून घेतात? हा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.

    संजू परब काय म्हणाले?

    नाईक यांच्या आरोपाला शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “वैभव नाईक यांनी एक व्हिडिओ केला आहे आणि ही नोटीस दाखवत ते सगळ्यांना सांगत आहेत की, फिरोज बाबा प्रकरणात मला नोटीस आली आहे. पण मला आतापर्यंत कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही आणि मला बजावण्यात आलेली नोटीस ही वैभव नाईक यांच्यापर्यंत कशी पोहोचली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्याकडे आतापर्यंत नोटीस आलेली नाही,” असं स्पष्टीकरण संजू परब यांनी दिलं आहे.

    दरम्यान, सुनेच्या आरोपामुळे विनायक राऊत हे अडचणीत आलेले असतानाच भोंदूबाबा प्रकरणात आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचंही नाव आल्याने ट्विस्ट निर्माण झाला असून त्यांची चौकशी होऊन कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed