• Fri. Jul 17th, 2026

    दरडींच्या छायेत त्र्यंबकेश्वर; ‘ब्रह्मगिरी’च्या नैर्ऋत्य भागात कोसळली, वाहतूक नसल्याने टळला अनर्थ

    दरडींच्या छायेत त्र्यंबकेश्वर; ‘ब्रह्मगिरी’च्या नैर्ऋत्य भागात कोसळली, वाहतूक नसल्याने टळला अनर्थ

    Nashik Brahmagiri Mountain Landslide: गोदावरी उगमस्थानी जाण्यासाठी भातखळा धर्मशाळेपुढे किल्ल्याच्या मुख्य पायऱ्यांनी जाताना डाव्या बाजूचा डोंगरकडा सुटावला आहे. खोदकामांनी वाहून आलेला गाळ नदीघाटात साचल्याने भाविकांना धोका संभवतो.

    ब्रह्मगिरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे बुधवारी (दि. १५) रात्री अहिल्या धरणाच्या बाजूला मोठा आवाज करीत दगड कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या नैर्ऋत्य भागात त्र्यंबकेश्वर शहराच्या बाजूने डोंगर सुटावल्याने बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दरड कोसळली.

    रात्रीची वेळ असल्याने गडद अंधारात काही धाडसी युवकांनी टॉर्च घेऊन अहिल्या धरण परिसरात जाऊन पाहणी केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून, दिवसा घटना घडली असती तर भटकंती करणाऱ्या पर्यटकांना तसेच गाई, गुरे आणि बकऱ्या चारणाऱ्यांना धोका होता, असे सांगण्यात येत आहे.

    Maharashtra TimesUddhav Thackeray : वाईट काळ संपेल, चांगले दिवस येतील, उद्धव ठाकरेंची ग्वाही; नगरसेवकांकडून एकनिष्ठतेची शपथ
    विशेष म्हणजे, सन २०२१ मध्ये ब्रह्मगिरीच्या पश्चिम बाजूला भूमाफियांनी सुरुंग लावले आणि ब्रह्मगिरीचे दगड निखळण्यास सुरुवात झाली. तेव्हा महसूल, वन विभाग आणि त्र्यंबक नगरपरिषदेसह संबंधित प्रशासनाने काणाडोळा केला. विशेष म्हणजे, पर्यावरणप्रेमींनी याबाबत आवाज उठवला, तसेच ‘मटा’च्या माध्यमातून ‘सेव्ह ब्रह्मगिरी’ ही मोहीम राबवली. त्यानंतर विधिमंडळात चर्चा घडली. मात्र, खोदकाम सुरूच राहिले.

    पर्यटनस्थळांच्या बंदोबस्तात वाढ
    त्र्यंबकेश्वर : पावसाचे पुनरागमन पाहता येत्या शनिवार, रविवारी त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटनस्थळांवर गर्दी उसळण्याची शक्यता आहे. भावली धरणावर पर्यटक मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. अंजनेरी किल्ला, पहिने घाट, नेकलेस धबधबा, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला, ब्रह्मगिरी व गंगाद्वार पर्वत, अहिल्या धरण परिसरात पर्यटकांचा राबता असतो. या दृष्टीने प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. पर्यटन स्थळांवर वन विभागाचे कर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत स्वयंसेवक तैनात केल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी दिली. सुरक्षित पर्यटनासाठी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे तहसीलदार गणेश जाधव-पाटील यांनी सांगितले.

    Maharashtra TimesNashik Accident News : मागून येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल, इकोला जोरदार धडक, दोन्ही ट्रकमध्ये कार दबली; चौघांचा जागीच करुण अंत
    या उपाययोजनांची गरज
    -सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पडण्यासाठी सर्वप्रथम सुरू असलेले खोदकाम थांबवावे
    -जमीन विकसकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बंद केलेले अथवा वळवलेले प्रवाह खुले करावे
    -ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांच्या बाजूने असलेल्या डोंगरकड्याला संरक्षक जाळी बसवणे
    -पायथ्याला सुरू असलेले उत्खनन रोखणे तसेच अवैध बांधकामांना प्रतिबंध करणे आवश्यक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा