• Fri. Jul 17th, 2026

    Sanjay Raut: पाटील, आव्हाड अचानक एकनाथ शिंदेंना भेटले, राजकीय बदलाच्या चर्चांना उधाण; संजय राऊतांचं खास शैलीत रोखठोक भाष्य!

    Sanjay Raut: पाटील, आव्हाड अचानक एकनाथ शिंदेंना भेटले, राजकीय बदलाच्या चर्चांना उधाण; संजय राऊतांचं खास शैलीत रोखठोक भाष्य!

    नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात मिश्किल भाष्य केलं आहे. मागील तीन दिवसांत जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले असताना, केवळ भेटीगाठींवरून पक्षांतराचे निष्कर्ष काढणे चुकीचं असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. उद्या ते रामदास आठवलेंना भेटले तर त्यांच्या पक्षात जाणार का? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

    नागपूर इथं बोलताना संजय राऊत म्हणाले की, “उद्या जर जयंत पाटील हे रामदास आठवले यांना भेटायला गेले, तर ते त्यांच्या पक्षामध्ये जाणार आहेत का? महाराष्ट्रात आणि देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. नेते एकमेकांना भेटत असतात. याचा अर्थ ते त्या पक्षात गेले किंवा त्या पक्षातून बाहेर पडले, असा होत नाही. जयंत पाटील असोत किंवा जितेंद्र आव्हाड, हे दोघेही विविध पक्षांच्या नेत्यांशी सातत्याने संवाद साधत असतात. ते फ्री बर्ड आहेत. त्यांना भेटू द्या,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसंच प्रत्येक भेटीचा अर्थ पक्षांतर किंवा राजकीय समीकरणांतील मोठा बदल असा लावणे योग्य नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

    ठाकरेंच्या पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण का?

    ‘हे लग्नाचं आमंत्रण नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ हिंदुत्वाशी संबंधित एक कार्यक्रम आयोजित केला आहे. रामभक्त आणि रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवक म्हणून त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे,’ असं ते म्हणाले. याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “नागपूर ही हिंदुत्वाची राजधानी आहे. हिंदुत्वाशी संबंधित सर्व प्रमुख व्यक्तींना आम्ही आदरपूर्वक निमंत्रण दिले आहे. सरसंघचालकांना येणे शक्य नसेल, तर त्यांनी प्रतिनिधी पाठवावा, अशी विनंती केली आहे. भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांनाही आम्ही निमंत्रित केले आहे,” असे राऊत म्हणाले.

    दरम्यान, भाजप नेत्यांनी या निमंत्रणावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर टीका करताना राऊत म्हणाले, कसा काय राजकीय विरोध करू शकतात? ते काय बोलले, हे मला माहीत नाही. मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे असतात. आम्ही सलग २५ वर्षे भारतीय जनता पक्षासोबत काम केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही दीर्घकाळ राजकीय सहकार्य राहिले आहे. अशा कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात काहीच गैर नाही. त्यावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणं हा मूर्खपणा आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed